शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यम...वाघोळ्यातील ते ४४ जण औषध न घेताच झाले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 11:44 IST

Corona Virus News : २० दिवस पाॅझिटीव्ह रूग्णांचा अनेकांशी संपर्क आल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असून, आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.

- विश्वनाथ पूरकरलोकमत न्यूज नेटवर्कनरवेल : येथून जवळच असलेल्या वाघोळा येथील ४४ नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल तब्बल २० दिवसांनी पॉझिटीव्ह मिळाला. आरोग्य विभागाने या सर्वांची ५ मे रोजी पुन्हा तपासणी केली असता ते सर्वच जण निगेटीव्ह आले. २० दिवस पाॅझिटीव्ह रूग्णांचा अनेकांशी संपर्क आल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असून, आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र नरवेल अंतर्गत वाघोळा गावात १७ एप्रिल रोजी शिबीर घेऊन गावातील नागरिकांची कोरोना चाचणी केली. त्यानंतर त्यांचे अहवाल बुलडाणा येथे पाठविण्यात आले. हे अहवाल ४ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध झाले. त्यानंतर ५ मे रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी वाघोळा येथे आले व १७ एप्रिल रोजी तपासणी केलेल्या ४४ जणांना त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले. तसेच पॉझिटीव्ह रूग्णांसाठी औषध, गोळ्या आणल्या. यावेळी गावातील नागरिक चांगलेच संतत्प झाले. एवढ्या विलंबाने अहवाल आल्याने गावकºयांनी रोष व्यक्त केला. २० दिवसांत पॉझिटीव्ह असलेल्या नागरिकांनी अनेकांशी संपर्क केला. दुकानांमध्ये जाऊन खरेदीही केली. ५ मे रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांच्याकरिता औषध घेऊन गेल्यावर गावकºयांनी विरोध करीत पुन्हा चाचणी करण्याची मागणी केली. त्यानुसार आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी ४४ पॉझिटिव्ह व्यक्तींची पुन्हा चाचणी केली असता ते सर्व जण निगेटीव्ह आले. वाघोळा गावात कोरोना बाधित रुग्णांची वाढलेली संख्या पाहता तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी ५ मे रोजी सायंकाळी थेट वाघोळा गाव गाठीत ग्रामस्तरीय समितीची तातडीची बैठक घेतली. 

आरटीपीसीआर चाचणीला २० दिवस पूर्ण झाले असून अहवाल रखडले होते. आपण तपासणी केलेल्यांना लक्षणांबाबत विचारणा केली असता कोणतेही लक्षणे नव्हती. त्यानंतर ५ मे रोजी कोरोना चाचणी केली असता सर्वजण निगेटीव्ह आले.- डॉ. मीनल तडकेवैद्यकीय अधिकारी, नरवेल