शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

फरार तलाठय़ाची न्यायालयापुढे शरणागती!

By admin | Updated: June 22, 2017 04:30 IST

बनावट अकृषक प्रकरणी २८ जूनपर्यंंंत पोलीस कोठडी.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चिखली भाग १ शिवारातील २ हेक्टर ४२ आर शेतजमिनीच्या बनावट अकृषक आदेशाद्वारे फेरफार व इतर दस्तावेज रूजू केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या तलाठी रियाज शेख याने १९ जून रोजी जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरणागती पत्करली असून, न्यायालयाने तलाठी शेख यास २८ जूनपर्यंंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.याबाबत सविस्तर असे की, तांबुळवाडी येथील गणेश सखाराम गंडे यांची चिखली भाग १ शिवारातील २ हेक्टर ४२ आर जमीन आहे. याबाबत २ एप्रिल २0१२ रोजी तलाठी रियाज शेखने गंडेंची भेट घेऊन माझे व तत्कालीन एसडीओ निकोसे यांचे घनिष्ठ संबंध असल्याची बतावणी करीत सदरची जमीन अकृषक करून देतो, यासाठी ३0 हजार रुपये शासकीय चलन भरण्यासाठी द्यावे लागतील, तसेच या कामासाठी पत्नीच्या नावाने सदर जमिनीतील प्लॉट क्रमांक २ ज्याचे एकूण क्षेत्रफळ १0२0 चौ.फूट याची पोकळ खरेदी खत करून द्यावी लागेल, अशी मागणी केली होती. त्यानुसार गंडे यांनी दुसर्‍या दिवशी ३0 हजार रुपये शिवाजी लक्ष्मण साखरे यांच्या समक्ष दिले होते.