शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरग्रस्त विवाहितेची जगण्यासाठी धडपड!

By admin | Updated: July 20, 2014 23:56 IST

एका २३ वर्षीय विवाहितेला मुळव्याधीचा कॅन्सर आहे. या आजारामुळे तिला असह्य वेदना सहन कराव्या लागतात.

खामगाव: तालुक्यातील हिवरखेड येथील एका २३ वर्षीय विवाहितेला मुळव्याधीचा कॅन्सर आहे. या आजारामुळे तिला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. दोन चिमुकल्यांमध्ये जीव गुंतल्यामुळे तिची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, घरची परिस्थिती हलाखिची सुमारे दीड लक्ष रुपये खर्चांची शस्त्रक्रीया रखडली आहे. तालुक्यातील हिवरखेड येथील पंढरी राऊत हे शेती करतात. शेती आणि शेतात मजुरीकरून मिळणार्‍या उत्पन्नातून आई, वडिलांसह पत्नी आणि दोन चिमुकल्यांच्या संसाराचा गाडा ओढतात. पाच-सहा वर्षांपासून सुरळीत संसार सुरू असतानाच गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. त्यांच्या पत्नी वनिता राऊत(२३) यांना मुळव्याधीचा आजार जडला. या आजाराचा त्रास असह्य झाल्यामुळे त्यांनी अकोला येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू केले. येथे त्यांच्या प्रकृतीत कोणताही फरक पडत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रीया करण्याचे सुचविले. परंतु, परिस्थिती हलाखिची असल्यामुळे राऊत यांनी पत्नीला संत तुकाराम कॅन्सर रुग्णालय, अकोला येथे हलविले. या रूग्णालयातही उपचारासाठी लाख रुपयांपर्यंत खर्च सांगण्यात आला. या आजारावर त्यांनी सुरूवातीला उपचार केला. मात्र, महिन्याकाठी होणारा खर्च त्यांना झेपेनासा झाला. त्यामुळे त्यांनी पुढील उपचार थांबविले आहेत.डॉक्टरांनी वनिता यांच्यावर शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला दिला आहे. त्याकरीता एक ते सव्वा लाख रुपये खर्च अपेक्षित असून पत्नीचा जीव वाचविण्यासाठी पंढरी राऊत केविलवाणी धडपड करीत आहेत. दानदात्यांनी वनिता यांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.