लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील शेतकऱ्यांनी ५ जून रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान बसस्थानकावर वाहने अडवून विनापरवानगी रास्ता रोको केला. त्यामुळे रायपूरचे ठाणेदार जे.एन.सय्यद, ए.एस.आय.यशवंत तायडे, सुमेरसिंग ठाकूर, शे.कय्युम यांनी २५ शेतकऱ्यांवर कारवाई करून रायपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पळसखेड भट येथील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमुक्ती व शेतमालाला योग्य भावासाठी शेतकऱ्यांनी बसस्थानकावर एस.टी.बसेस, खासगी वाहने अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये रमेश गवते, सुधाकर भोसले, शेषराव गुळवे, सोहम सुरोशे, रामेश्वर खंडागळे, किसन मेरत, रामेश्वर भोसले, अमोल चिंचोले, संतोष सुरोशे, रामलाल सातपुते, विठ्ठल भोपळे, गजानन पवार, गजानन भोसले, आत्माराम खंडागळे, जनार्धन खंडागळे, गजानन चिंचोले या शेतकऱ्यांनी रास्ता रोकोमध्ये सहभाग घेतला होता.
रास्ता रोको : शेतकऱ्यांवर कारवाई
By admin | Updated: June 7, 2017 00:13 IST