शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरोवर विकास व व्यवस्थापनाच्या दिशने पडतेय पाऊल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:34 IST

नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एस. के. सुक्रे आणि माधव जमादार यांनी लोणार सरोवर येथे प्रत्यक्ष येऊन आतापर्यंत झालेल्या कामांची पाहणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोणार सरोवर विकास व व्यस्थापनाच्या दिशेने पावले पडण्यास प्रारंभ झाला असून भोपाळ येथील स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किस्ट्रक्चरच्या सहाय्यक प्राध्यापक विशाखा कव्हेटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास तीन महिन्यानंतर पुन्हा लोणार सरोवरास भेट देऊन पाहणी केली. यापूर्वी २३ नोव्हेंबर २०१९ ला त्यांनी लोणार सरोवर परिसरास भेट देऊन पाहणी केली होती.दरम्यान, सरोवरात १५ आणि काठावर पाच स्मारके असून त्यांचे जतन दुर्लक्षीत झालेले आहे. त्याची पाहणी यापूर्वी करण्यात आली होती. सोबतच महसूल, पुरातत्व, वनविभाग, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूजल सर्व्हेक्षणसह संबंधित विभागाकडून विकास आराखड्याच्या दृष्टीने माहिती संकलीत करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. प्रामुख्याने आगामी दहा वर्षामध्ये या ठिकाणी करावयाच्या कामाच्या संदर्भाने भोपाळवरून आलेल्या या मंडळींनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.लोणार सरोवर विकासासंदर्भात धिम्या गतीने पडणारी पावले पाहता गेल्या वर्षी नागपूर खंडपीठाने यंत्रणेला फटकारले होते. त्यानंतर ‘लोणार सरोवर एकात्मिक विकास व्यवस्थापन आराखडा’ बनविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याची जबाबदारी भोपाळ येथील स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किस्ट्रकचरला सोपविण्यात आली होती. २३ नोव्हेंबरला भोपाळच्या या कॉलेजच्या प्राध्यापकांनी लोणारला पहिल्यांदा भेट दिली होती.लोणार सरोवराचे जतन व्हावे व तेथे विकास व्हावा, या दृष्टीकोणातून नागपूर खंडपीठात ऐक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सरोवर क्षती प्रतिबंधक तथा संवर्धन समिती गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी या समितीच्या अध्यक्ष आहेत. खडंपीठच्या निर्देशानुसार ही समिती सध्या कार्यरत असून खंडपीठाने दिलेल्या सुचनेनुसार लोणार सरोवर व परिसराचा सर्वंकष असा एकात्मिक विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. या समितीने बोलावल्यानुसार दुसऱ्यांदा भोपाळ येथील स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किस्ट्रकचरच्या विशाखा कव्हटेकर आणि रमेश भोळे लोणारात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येवून गेले.त्यानुषंगाने कच्चा आराखडा तयार करण्यास प्रत्यक्ष प्रारंभ होण्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत. दोन दिवसापूर्वीच नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एस. के. सुक्रे आणि माधव जमादार यांनी लोणार सरोवर येथे प्रत्यक्ष येऊन आतापर्यंत झालेल्या कामांची पाहणी केली होती. त्यामुळे प्रशासकी पातळीवरही यासंदर्भात आता हालचालींनी वेग घेतला आहे. त्यामुळे आराखडा लवकरच तयार होईल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा