अमडापूर : येथून जवळच असलेल्या ५ कि.मी. अंतरावरील उंद्री गावामध्ये चोरट्यांनी ३ घरांतील नगदी १७ हजार व २ मोबाईलसह १८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २ जुलैच्या रात्री घडली. उंद्री येथे अज्ञात चोरट्यांनी सचिन मोतीराम चिंचोले यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी तोडून घरातील २ मोबाईल किं. १ हजार रूपये तसेच डब्यातील १0 हजार रूपये असा माल लंपास केला तर विनोद जगन्नाथ हेलरकर यांच्या घरातील ३ हजार ५00 रूपये नगदी, सुपडा बाळु हातागळे यांच्या घरातील ३ हजार ५00 नगदी असा एकूण १८ हजार रूपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत सचिन मोतीराम चिंचोले (वय २४) रा.उंद्री याने अमडापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द अप.नं.८७/0१४ कलम ४५७, ३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास एएसआय शेख युनुस हे करीत आहे. परिसरात लहान मोठय़ा चोर्यांचे सत्र सुरूच असल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला की नाही, असा रोष नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मागील काही दिवसापासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी घरफोट्या व शेतातील साहीत्य चोरीचे प्रकार घडत आहेत.
एकाच रात्री ३ घरांमध्ये चोरी
By admin | Updated: July 3, 2014 23:01 IST