शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामरोजगार सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST

महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांची संख्या २८ हजार १४४ एवढी असून, राज्य सरकारने महात्मा गाधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामरोजगार ...

महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांची संख्या २८ हजार १४४ एवढी असून, राज्य सरकारने महात्मा गाधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्यामध्ये सन २००६ पासून आजतागायत राज्यात एकूण २८ हजार १४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून ६ टक्के मानधनावर कार्यरत असून, सन २००६ पासून गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतात. पण प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनलच्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते. पण राज्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्यावर सुडबुध्दीने ग्रामरोजगार सेवकावर खोट्या प्रोसेडिंगद्वारे कामावरून कमी करून जाणिवपूर्वक अन्याय केला जातो. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून, त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना मानसिक त्रास होऊन कोणत्या निर्णयाला सामोरे जावे लागते व त्यांच्या कुटुंबाची पालन पोषणाची जिम्मेदारी कुटुंब प्रमुख म्हणून रोजगार सेवकावर असल्याने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व त्यांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील एकूण २८,१४४ ग्रामरोजगार सेवक यांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करून न्याय द्यावा, अन्यथा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयासमोर सकाळी १० वाजेपासून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. राज्यातील ग्रामरोजगार सेवकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार,गटविकास अधिकारी, ठाणेदार पोलीस स्टेशन मेहकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मेहकर तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष विनित वाघ, म. झाकिर हुसेन शेख, शंकर देशमुख, प्रकाश तायडे, भगवान अवसरमोल, संतोष राठोड, दिलीप बोराडे, मुरलीधर मोरेसह असंख्य ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.