शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नाला बांधातील गाळ काढण्यास सुरुवात

By admin | Updated: February 27, 2016 01:56 IST

लोकसहभागातून होणार काम; पाणी साठा वाढून सिंचनाची होणार सुविधा.

अंजनीखुर्द (जि. बुलडाणा): जलसंधारणाच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या तालु क्यातील अंजनी खुर्द येथील सिमेंट नाला बांधातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या कामास आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते बुधावारपासून शुभारंभ करण्यात आला आहे.गत दोन वर्षांत पाण्याआभावी शेती पिकांचे उत्पादनात ७0 टक्के घट आली आहे. या समस्येवर मात करून सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होण्याकरिता राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत जलयुक्त शिवार हे अभियान राबवण्यात येत असून, याकरिता मोठा निधीही उपल्बध करून दिल्या जात आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिंचनाचे नवीन स्रोत निर्माण करताना मात्र जुन्या स्रोतांकडे दुर्लक्ष होत होते. सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी यापूर्वी विविध योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी नदी -नाल्यांवर जागोजागी साखळी पद्धतीने सिमेंट बांध बांधण्यात आले. या बांधामुळे नदी- नाल्यांच्या काठावरील दोन्ही बाजूच्या शेतकर्‍यांना शेतीसाठी हमखास पाणी उ पल्बध होऊन शेतकर्‍यांना मोठा फायदा झाला. पावसाचे पाणी जागीच अडवून ते जमिनीतच जिरवल्यामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. परिणामी मुबलक पाणी साठा संचीत होऊन मोठय़ा प्रमाणावर शेतजमीन सिंचित झाल्या. परंतु १५ वर्षात सिमेंट नाला बांधाच्या पात्रामध्ये गाळ साचला आहे. अशा नाल्यातील गाळ काढून नाला खोलीकरण केल्यास ही समस्या बर्‍याच अंशी कमी होईल. दरम्यान अंजनी खुर्द येथील सिमेंट नाला बांधातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या कामाचा आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार सुरेश कव्हळे, गट विकास अधिकारी ओमप्रकाश यादव, कृउबास सभापती शिव पाटील तेजनकर, पं.स. सभापती ज्ञानेश्‍वर चिभडे, तालुका शिवसेना प्रमुख प्रा.बळीराम मापारी, कांता पाटील वायाळ, माजी सरपंच मंडोधर चौधरी, भाजपा शहराध्यक्ष विजय मापारी, राष्ट्रवादीचे भगवान महाजन, मिलिंद पिंपरकर, बाळकृष्ण राठी व शेतकरी उपस्थित होते.