शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एसटी, खासगी वाहतूक फुल!

By admin | Updated: October 26, 2014 23:33 IST

खामगावात दिवाळीनिमित्त बसस्थानकावर तोबा गर्दी, सर्वसामान्यांची एसटीला पसंती.

खामगाव : दसरा, दिवाळी, भाऊबीज या सणासुदीच्या दिवसात एसटी, रेल्वेसह खासगी प्रवासी वाहतुकीवर प्रवाशांची गर्दी वाढली असून, रेल्वे, एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. या काळात नेहमीपेक्षा २५ टक्के प्रवासी जास्त असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.दिवाळीनिमित्त पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणी कामानिमित्त असणारे लोक गावी परततात. त्यामुळे बाहेरून येणार्‍या गाड्यांमध्ये गर्दी असते. ग्रामीण भागातून शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी खरेदीसाठी येतात. त्यामुळे एसटी बस तुडुंब भरून जात आहेत. दिवाळीनंतर पाडवा, भाऊबीज या काळात गर्दीचा ओघ आणखीच वाढ तो. विशेषत: भाऊबीजेसाठी माहेरी जाणार्‍या महिलांची संख्या वाढल्याने गर्दी होते. याबाबी लक्षात घेऊन एसटी महामंडळार्फे जादा बस सोडण्यात आल्या आहेत. गर्दीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, वेळेवर बस मिळाव्यात यासाठी आगारांकडून नियोजन करण्यात आले आहे. खामगाव, तसेच जिल्ह्यातील इतर आगारांतून नागपूर, अमरावती, जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी आदी मोठय़ा शहरांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीचा कालावधी असल्याने आहे त्या बसच्या फेर्‍याही वाढविण्यात आल्या आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता अवैध प्रवासी वाहतूकही जोरात आहे. चौकाचौकांतून जीप, तीनचाकी रिक्षा भरून जात आहेत.शेगाव रेल्वेस्थानकावरही प्रवाशांची वर्दळ आहे. नोकरीनिमित्त परराज्यात, तसेच सैन्यात असलेले जवान दिवाळीला गावाकडे येत आहेत. सलग असलेल्या सुट्यांत अनेकांनी पर्यटनासाठीही बुकिंग केले आहे. त्यामुळेही रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होत आहे. दिवाळी झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसांचा कालावधी एसटीसाठी गर्दीचा असतो. त्यामुळे जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. कोणत्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी महामंडळ घेत असल्याचे खामगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख सुभाष पाटील यांनी सांगीतले.