खामगाव : अकोला येथून खामगावकडे जाणार्या एसटीची समोरून येणार्या लक्झरीला समोरासमोर धडक झाल्याने सात प्रवासी जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ६.३0 वाजेच्या सुमारास घडली. अपघा तग्रस्त एसटीला पाठीमागून येणार्या ट्रकने धडक दिली. प्राप्त माहितीनुसार अकोला आगाराची बस क्र. एमएच४0- वाय ५११२ ही एसटी औरंगाबादकडे सकाळीच निघाली. दरम्यान, खामगावनजीकच्या कोलोरी- िपंप्राळा शिवारात समोरुन येणार्या वाहन क्र जीजे १९- व्ही ९३९३ क्रमांकाच्या लक्झरीशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसटी व लक्झरीच्या समोरच्या भागाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तर डिगांबर आखतकर, शरद कुळकर्णी, सीताराम वडापल्ली, सीमा इंगोले, महादेव बोराडे, धनंजय मंगळे, जगन्नाथ मंगळे हे सात प्रवासी जखमी झाले. जखमींना त्वरित खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. अ पघातग्रस्त उभ्या एसटीला पाठीमागून येणार्या ट्रकने धडक दिल्याने एसटीतील प्रवासी जखमी झाल्याची माहि ती आहे. अपघातात एसटी चालक गजानन सातपुते जखमी झाला आहे. झालेल्या अपघाताची लक्झरीचा चालक साबीरशा बशीरशा फकीर (वय ३0) याने खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला एसटीचा चालक गजानन शिवाजी सातपुते रा. अकोला यांच्या नावे तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी एसटी चालक गजानन सातपुते विरुद्ध कलम २७९, ३३७, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.जखमींना तातडीची पाच हजारांची मदतएसटी व लक्झरीचा अपघात होऊन सात जण जखमी झाल्याची घटना घडताच खामगाव आगार व्यवस्थापक सुभाष पाटील, स्थानकप्रमुख जे. व्ही. बोरले, आशीष लकडे यांनी जखमींची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून डिगांबर आखतकर, शरद कुळकर्णी, सीताराम वडीपल्ली यांना प्रत्येकी १ हजाराची तर सीमा इंगोले, महादेव बोराडे, धनंजय मंगळे, जगन्नाथ मंगळे यांना प्रत्येकी ५00 रुपयांची मदत दिली.
एसटी व लक्झारीची धडक; सात प्रवासी जखमी
By admin | Updated: June 7, 2014 00:17 IST