शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नियम धाब्यावर बसविल्यानेच झाला कोरोनाचा फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 12:06 IST

CoronaVirus in Khamgaon नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्यानेच कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होत असून, कोरोना रोखण्यासाठी शासनाने ठरविलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्यानेच कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.   शहरातील मुख्य बाजारपेठ, टाॅवर चाैक, गोडबोल चाैक, जलंब नाका, निर्मल पाॅइंट, बसस्थानक परिसर, अग्रसेन चाैक, वाडी परिसर, घाटपुरी पिरसर या ठिकाणी दररोज गर्दी होत आहे.    गेल्या वर्षी म्हणजे साधारणपणे २२ मार्चला लॉकडाऊन सुरू झाला. या घटनेच्या वर्षपूर्तीला केवळ एक महिना राहिला आहे, असे असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णसंख्या वाढण्यामागे कमी झालेल्या कोरोनाच्या चाचण्या हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, सर्दी, तापाची लक्षणे दिसूनही अनेक जण त्यावर वरवरचे उपचार करून स्वत:ला दिलासा देण्याचे काम करीत आहेत. परंतु, त्यांना कोरोना झाला की नाही, याची वैद्यकीय चाचणी करून घेण्यास आज अनेक अशिक्षितांप्रमाणे सुशिक्षितही घाबरत असल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे गेल्या वर्षी एप्रिल, मे महिन्यात ज्याप्रमाणे प्रभागनिहाय ‘कंपल्सरी टेस्ट’ केल्या होत्या, तशाच पद्धतीने या चाचण्या करण्याची गरज निर्माण झाली आहे. शंभरातील जवळपास ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे टेस्टनंतर पुढे येऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.  

जमावबंदी अंमलबजावणीचे आव्हान  कोरोनाकाळात जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या नात्याने बुधवारपासून जमावबंदी लागू केली आहे. परंतु, या जमावबंदीच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.  आज बाजारातील गर्दी ही प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. पुन्हा एकदा पथक स्थापन करून कारवाईची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या