शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संप आंदोलनास घाटाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: June 6, 2017 00:20 IST

बंदला संमिश्र प्रतिसाद : रस्त्यावर कांदे फेकून रास्ता रोको आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, शेतमालास योग्य हमीभाव, या व इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सर्वपक्षीयांच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी कमी भावामुळे सडणारा कांदा रस्त्यावर फेकून आपला रोष व्यक्त करीत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला स्थानबद्ध केल्यानंतर सुटका करण्यात आली. आंदोलन खामगाव तालुक्यात खामगाव, पिंप्री गवळी, लाखनवाडा या व इतर ठिकाणी करण्यात आले. तसेच जळगाव जामोद तालुक्यात पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जळगाव शहरासह आसलगाव, पिंपळगाव काळे, जामोद इत्यादी गावांमध्ये शेतकऱ्यांनी शांततेत आणि कडकडीत बंद पाळला. शेतकऱ्यांच्या संपाला प्रतिसाद म्हणून आजच्या बंदमध्ये शेतकरी संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राकाँ, भाकप, माकप, भारिप-बमसं आणि शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. जळगाव शहरात व्यापारी संघटनेच्या सहकार्याने १०० टक्के बंद यशस्वी करण्यात आला. दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली. संग्रामपूर तालुक्यात संग्रामपूर सोबतच वरवट बकाल, सोनाळा, टुनकी येथे पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.संग्रामपूर येथे दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच प्रतिष्ठाने बंद होती. या बंदमुळे शहरात शुकशुकाट होता. या संपामध्ये सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी भाजपा सरकारविरोधात नारेबाजी करीत रोष व्यक्त केला. यावेळी पहिल्यांदाच शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून संपामध्ये सहभागी होत असताना दिसून आला. आंदोलन यापुढेदेखील सुरु ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.मलकापुरातही आंदोलनात संमिश्र प्रतिसाद लाभला. विविध राजकीय पक्ष तथा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दर्शवित ५ जून रोजी सकाळी रस्त्यावर उतरून बाजारात फिरुन व्यावसायिकांची दुकाने बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलीस स्टेशनला आणून स्थानबद्ध केले. त्यामुळे संपाची धग कायम असली, तरी या संपाचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर पूर्णपणे जाणवला नाही. शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवित भाराकाँ, राकाँ, शिवसेना, शेतकरी संघटना, प्रहार, भारत मुक्ती मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आदी राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत बाजारपेठ बंदचे आवाहन करीत व्यावसायिकांची दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड येथेही बंदला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच शेतकऱ्यांचा सहभाग होता. रस्त्यावर कांदा व भाजीपाला फेकून शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.