शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 00:06 IST

बुलडाणा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला. सकाळी ९ वाजता विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या मुख्य मार्गावरून रॅली काढून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संपाच्या चौथ्या दिवशी विविध राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या पृष्ठभूमिवर बुलडाण्यात विविध राजकीय पक्षांनी रॅली काढून शहर बंदचे आवाहन केले. प्रारंभी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी गांधी भवन परिसरात एकत्र आले. त्यानंतर जयस्तंभ चौक, संगम चौक मार्गे रॅली काढून प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यात काँग्रेसचे विजय अंभोरे, जि.प.सदस्य जयश्री शेळके, तालुकाध्यक्ष सुनील तायडे, अ‍ॅड. शरद राखोंडे, सुनील सपकाळ, विनोद बेंडवाल, रियाजखा पठाण, नगरसेवक अजहर खान, आकाश दळवी, सुरेश सरकटे, जाकीर कुरेशी, अमित टेलर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश शेळके, अ‍ॅड. सुमित सरदार, शिवसेनेचे संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, माजी जि.प.सदस्य अशोक इंगळे, लखन गाडेकर, नगरसेवक सोनु जाधव, आशिष खरात, दीपक सोनुने, जीवन उबरहंडे, अनूप श्रीवास्तव, नीलेश राठोड, शेतकरी संघटनेचे नामदेवराव जाधव, सुभाष गिरी आदींनी सहभाग घेतला होता. प्रवाशांची गैरसोयविविध राजकीय पक्षांनी बंदचे आवाहन केल्यामुळे एसटी महामंडळाने सकाळी ९ वाजेपासून प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे जाहीर केले. त्यामुळे बसस्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकून पडले होते. दुपारी १ वाजताच्यादरम्यान पोलीस बंदोबस्तात काही एसटीची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली होती, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.