शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला फुटले कोंब; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात ३३ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा पेरा केला असून सोयाबीन सोंगणीला आले आहेत;परंतु सतत पाऊस ...

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात ३३ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा पेरा केला असून सोयाबीन सोंगणीला आले आहेत;परंतु सतत पाऊस पडत असल्याने सोंगणीला विलंब हाेत आहे. सततच्या पावसामुळे उभ्या पिकाला कोंब फुटले आहे. त्यामुळे याहीवर्षी सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे.

तालुक्यात ३३ हजार १०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. सोयंदेव येथील शेतकरी शिवनारायण नागरे यांच्याकडे ६ एकर २० गुंठे शेती असून त्यांनी संपूर्ण शेतात सोयाबीनचा पेरा १० जूनला केला होता. सोयाबीन चांगली वाढलेली असून शेंगाही मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत. २० सप्टेंबरपासून तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सोयाबीन हे पीक साडेतीन महिन्याचे असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची पानगळ सुरु झाली आहे. दोन-चार दिवसांत तोडणीला पीक आले असताना सतत पाऊस बरसत आहे. त्यातच सोयाबीनच्या शेंगा ओल्या होऊन त्याला कोंब फुटू लागले आहेत. सोंगण्या अगोदरच निसर्गाचे संकट ओढावले आहे. सोयंदेव , रुम्हणा, चागेफळ, जांभोरा , साखरखेर्डा, शिंदी , राताळी , गुंज, मोहाडी, सवडद, गोरेगाव, काटेपांग्री, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा या भागातील शेतकऱ्यांनी मजुरांना प्रतिएकर ३ हजार रुपये सोंगण्याची मजुरी अग्रीम म्हणून दिली आहे. हा पाऊस असाच बरसत राहिला तर संपूर्ण पीक मातीमोल जाण्याची भीती वर्तवली जात आहे़

काेट

सहा एकर वीस गुंठे क्षेत्रात सोयाबीन पेरले. एकरी २० हजार रुपये खर्च आला. पावसाने कोंब फुटले असल्याने घरात दाणाही येण्याची शाश्वती नाही़

शिवनारायण नागरे, शेतकरी , सोयंदेव

पाऊस कुठे पडेल आणि कसा पडेल हे हवामान शास्त्रज्ञ सांगत असले तरी त्या अंदाजाच्या पलीकडे पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती पिवळे सोने काळे लागण्याची भीती वाटते.

रामप्रसाद डिघोळे, शेतकरी