शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्टय़ात वाढली टरबुजाची लागवड

By admin | Updated: December 18, 2014 01:07 IST

आधुनिक शेतीची कास : मल्चिंग पद्धतीने लागवड करण्यावर भर.

पंजाबराव ठाकरे / संग्रामपूर (बुलडाणा)  

      खारपाणपट्टय़ात मल्चिंग पेपरच्या वापराने टरबूज लागवडीचे क्षेत्रफळ वाढते आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वा पर करण्यात युवा शेतकर्‍यांची आघाडी दिसत आहे. यासाठी शासनाचे आर्थिक सहाय्य प्रोत्साहन ठरत असल्याने गतवर्षीपेक्षा यंदा दुपटीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर प्लास्टिक पेपरचा अवलंब करून टरबूज लागवडीचे टारगेट आहे. तालुक्यात खारपाणपट्टय़ाचा वाढता प्रभाव पाहता भूगर्भातील क्षारयुक्त पाणी सिंचनासाठी बाधा ठरत आहे. यामुळे जमिनीची पोत खराब होऊन चोपण होण्याचे प्रमाण वाढत आहे. अर्थात जमिनीचा सामू वाढता आहे. म्हणून या भागातील बागायती क्षेत्र वाढण्याऐवजी घटत आहे. बारमाही बागायतीसाठी जमीन निरोगी असावी म्हणून भूपृष्ठावरील पाण्याची गरज आहे. जोपर्यंंत जमिनीवरील पाणी पिकासाठी मिळणार नाही तोपर्यंंत या भागात भरपूर पाण्याची लांब दिवसाची पिके घेण्याचे क्षेत्रफळ वाढणार नाही. अशी स्थिती असल्याने पारंपरिक पद्धतीनुसार बागायती करणार्‍यांचा हिरमोड होत आहे; परंतु यामध्ये युवा शेतकर्‍यांनी बदल करण्यास सुरुवात केल्याने पाण्याचा अपव्यय टाळून केवळ पिकाच्या झाडापुर तेच पाणी देण्यासाठी व शेती तणमुक्त राहावी यासाठी मल्चिंग पेपर हा पर्याय स्वीकारण्यात हा भाग पुढाकार घेत आहे. गतवर्षी या भागासाठी कृषी विभागाकडून ६ ते ७ हेक्टरचे लक्ष्यांक होते. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी व टरबूज उन्हाळी पीक उत्पादन देणारे असल्याने यावर्षात २२ हेक्टरचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. तालुका कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकर्‍यांमध्ये याचा प्रसार केल्याने यंदा क्षेत्रफळात वाढ झाली आहे. जवळपास ४0 हेक्टर क्षेत्रफळावर टरबूज लागवड केली जाणार असून, पैकी २२ हेक्टर क्षेत्रफळामध्ये मल्चिंग पेपरचा वापर तर १८ हेक्टर क्षेत्रफळ विना मल्चिंग लागवड केली जाणार आहे. मल्चिंगमुळे तण नियंत्रण होत असल्याने किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. निंदणाचा खर्च वाचविता येतो. फळे सारख्या आकाराची व दज्रेदार तयार होतात. त्यामुळे बाजारात मागणी राहते. पाण्याचा वापर फक्त वेलापुरताच होत असल्याने इतर जमीन खराब होत नाही. शासनाच्या या योजनेमुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे दिसत आहे.