शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

वीज चमकताच झाडाचा आश्रय बेतू शकतो जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST

वीज ही सामान्यत: उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही; परंतु काही स्थान इतर ठि‍काणापेक्षा सुरक्षित असतात. ...

वीज ही सामान्यत: उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही; परंतु काही स्थान इतर ठि‍काणापेक्षा सुरक्षित असतात. मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षि‍त असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात. त्यामुळे आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. स्वत:साठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थि‍तीत वैद्यकीय सेवेसंदर्भात व स्थानिक आपत्कालीन सेवांचे संपर्क तपशिल तयार करावे. जर गडगडाटी वादळाचा, अतिवेगाने वाहणाऱ्या वादळ वाऱ्याचा अंदाज असेल तर घराबाहेर जाणे टाळावे. गडगडाट, वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करणे धोक्याचे आहे. घराबाहेर असल्यास मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळाद्वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागाशी संपर्क टाळणे आवश्यक आहे. अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या वायरपासून लांब राहणे आवश्यक आहे.

काय करावे...

विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू आणि वातानुकूलीत यंत्रे बंद ठेवण्यात यावे. आपल्या घराच्या आजूबाजूची वाळलेली झाडे किंवा फांद्या तोडून टाकणे. विजा चमकत असताना व घराबाहेर असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवावा. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच राहावे.

काय करू नये...

गडगडाटासह वादळ आल्यास उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टाॅवर्स, दिव्याचे खांब, धातुचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी टाळावे. घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन, मोबाइल व इतर इलेक्ट्रि‍क किंवा इलेक्ट्रीकल उपकरणे विद्युत जोडणीस हात लावू नये.

चेतावणीचे चिन्ह...

अतिवेगाने वारे, अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटी वादळ, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना, ही सर्व चेतावणीचे चिन्ह आहेत.