शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा विभागातून ६० इलेक्ट्रिक बसेस लवकरच धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST

बुलडाणा : वाढते इंधनाचे दर आणि निर्माण होणारा तुटवडा पर्यायाने होणारे एसटी महामंडळाचे नुकसान यामुळे आता परिवहन महामंडळ पर्यायी ...

बुलडाणा : वाढते इंधनाचे दर आणि निर्माण होणारा तुटवडा पर्यायाने होणारे एसटी महामंडळाचे नुकसान यामुळे आता परिवहन महामंडळ पर्यायी व्यवस्थेच्या शोधात आहे. म्हणून आता राज्य परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बसचा पर्याय शोधला आहे. शासनस्तरावर यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. बुलडाणा विभागातून ६० बसेससाठी प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक संदीप रायलवार यांनी दिली.

वाढत्या इंधन दरवाढीचा फटका सामान्य वाहनधारकांप्रमाणेच राज्य परिवहन महामंडळालाही बसत आहे. आधीच कोरोना विषाणू संसर्गामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे एसटीचे मोठे नुकसान झाले. बुलडाणा विभागातच रोज ४५ लाख रुपयांचे नुकसान हाेत होते. लॉकडाऊनच्या काळात सर्व बसेसची चाके थांबलेलीच राहिल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात, आता डिझेलच्या किमतीही वाढलेल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. दुसरीकडे, इंधनाचे दर वाढले असले तरी प्रवासी भाडे मात्र, एसटीला अद्याप वाढवता आलेले नाही किंवा वाढवले तरी ते फार मोठ्या प्रमाणात वाढवून प्रवाशांच्या खिशाला झळ पाेहोचवता येत नाही. याचा परिणाम म्हणून एसटीच्या नफ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. आधीच तोट्यात असलेल्या महामंडळाला इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेऊन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बुलडाणा विभागाकडून ६० बसेसचा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर बुलडाण्याच्या रस्त्यांवर ही महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस धावू शकतील. या बसेस बुलडाण्याला उपलब्ध होण्यासाठी अंदाजे महिनाभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

तीन तासांच्या चार्जिंगमध्ये ३०० किलो मीटरचा प्रवास

इंधनाचे वाढते दर पाहता आणि राज्य परिवहन महामंडळाची खालावलेली आर्थिक स्थिती पाहता इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक बस प्रभावी पर्याय ठरू शकणार आहे. एकदा तीन तास चार्जिंग केल्यानंतर ३०० किलो मीटरपर्यंत बस धावू शकणार आहे. त्यानंतर पुन्हा ३ तास चार्जिंग करणे आवश्यक असेल. त्यामुळे ६० बसेसच्या फेऱ्या या ३०० किमी अंतराच्या मर्यादेत निश्चित करण्यात आल्या आहेत.

तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशन

बुलडाणा विभागाला ६० इलेक्ट्रिक गाड्या प्राप्त झाल्यानंतर त्या गाड्यांची चार्जिंग करण्यासाठी बुलडाणा विभागात तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारल्या जाणार आहेत. त्यामध्ये एक बुलडाणा आगारात तर दुसरे खामगाव आणि शेगाव या तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारल्या जाणार आहे. या स्टेशनमध्ये पुढील काळात भर पडणार असून, संपूर्ण जिल्हाभर या इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.

अशा विभागल्या जातील इलेक्ट्रिक बस

आगार बसेसची संख्या

बुलडाणा १४

चिखिल ०४

खामगाव १५

मेहकर १५

जळगाव जामोद ०४

शेगाव ०८

एकूण ६०

येणाऱ्या इलेक्ट्रिक बसमुळे इंधनाची बचत तर होणारच आहे. सोबतच पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी हा उत्तम पर्याय असून, इंधनाचा खर्च वाचून महामंडळाला फायदा होणार आहे. पुढील महिनाभरात ही प्रक्रिया पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

-संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा.