शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींची सकारात्मकतेने सोडवणूक करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:00 IST

चिखली: सरकारने शेतकरी कर्जमाफीच्याबाबतीत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहुभूधारक असा कोणताही भेद केला नसला तरी या कर्जमाफीमध्ये अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत.

ठळक मुद्देशिवराणा मित्रमंडळाची ना. फुंडकर यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: सरकारने शेतकरी कर्जमाफीच्याबाबतीत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहुभूधारक असा कोणताही भेद केला नसला तरी या कर्जमाफीमध्ये अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. याची दखल घेत कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींचा सकारात्मक विचार करून त्यांची सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे करण्यात आली.याबाबत ना. भाऊसाहेब फुंडकर यांना २९ जुलै रोजी माजी जि.प. अध्यक्ष तथा शिवराणा मित्रमंडळाचे संस्थापक प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी त्यांना कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींविषयी माहिती देऊन शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने निवेदन सादर केले. या निवेदनात सन २००७ ते २००९ या कालावधीतील कर्जमाफीपासून वंचित बहुधारक शेतकºयांचे कर्ज माफ करण्यात यावे, सिलिंग कायद्याच्या भीतीने अनेक शेतकºयांनी शेतीची वाटणी कुटुंबातील सदस्यांमध्ये (खातेफोड) केली असल्याने ते सदस्य बँकेचे स्वतंत्र कर्जदार सभासदसुद्धा झालेत; परंतु शासनाने कुटुंबाची व्याख्या करून केवळ एका व्यक्तीला (कुटुंब प्रमुख) दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली व इतर सदस्य जे कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे किंवा १८ वर्षावरील असले तरी विभक्त कुटुंब रेशनकार्ड न केल्यामुळे केवळ एकाच व्यक्तीला कर्जमाफी मिळाली असल्याने प्रत्येक खातेदाराला कर्जमाफी देण्यात यावी, शासनाने कर्जमाफीची अट ३० जून २०१६ चे थकीत शेतकरी ही ठेवली आहे. तरी ही कर्जमाफी त्यांच्यावर अन्याय करणारी ठरत असल्याने कर्जमाफीची अट ३० जून २०१७ करण्यात यावी व जिल्ह्यातील शेतकºयांचे सन २०१३ ते १५ दरम्यानचे थकीत सूक्ष्म सिंचनाचे अनुदान त्वरित देण्यात यावे आणि पीक विम्याची ३१ जुलै २०१७ ची मुदत वाढविण्यात येऊन पीक विम्याचे अर्ज आॅफलाइन स्वीकारावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह शिवराणाचे श्रीकिसन धांडगे, विलाससिंह सुरडकर, नाना पवार, राजेश झगरे, सखाराम पाटील, शिवाजी पवार, विनायक पडघान, अ‍ॅड. अनिल कºहाडे, विठ्ठलराव करवंदे आदींसह तालुकाभरातील १२३ शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.