शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया आचारसंहितेच्या कचाट्यात!

By admin | Updated: October 24, 2016 02:47 IST

नगरपालिका निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारासाठी आता घ्यावी लागते सायबर टिमकडून परवानगी.

मनोज पाटील मलकापूर, दि. २३-नगरपालिका निवडणूकदरम्यान उमेदवार व त्यांच्या सर्मथकांना फेसबुक अथवा व्हॉट्स अँपद्वारे प्रचार करण्याकरिता जिल्हास्तरीय सायबर टीमकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे.नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. ही आचारसंहिता सोशल मीडियालाही लागू राहणार असून, निवडणूक विभागाचा सोशल मीडियावर ह्यवॉचह्ण राहणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या उमेदवाराच्या विरोधात अथवा सर्मथनार्थ मजकूर टाकल्यास त्याबाबत तक्रार झाल्यास अथवा आचारसंहिता पथकाला याबाबत शंका आल्यास मजकुराची परवानगी घेतली का? याची खात्री केली जाणार आहे. विनापरवानगी मजकूर प्रसिद्ध झाला असेल, तर त्यावर कारवाई केली जाणार आहे. अशाप्रकारे सोशल मीडियावर आचारसंहितेचा बडगा उगारण्यात आल्याने उमेदवार व त्यांच्या सर्मथकांना सावधतेची भूमिका वठवावी लागणार आहे.राज्यभरात नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजवून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूकदरम्यान प्रचारासाठी विविध प्रकारच्या जाहिरात, वृत्तपत्रे डिजिटल फलक व इतर छोट्या-मोठय़ा साधनासाठी आचारसंहितेची नियमावली लागू केली जात होती. तर आता नव्यानेच सोशल मीडिया ही या प्रचार यंत्रणेचा एक घटक झाल्याने त्यावरही निवडणूक आयोगाकडून निर्बंंध लावण्यात आले आहेत. फेसबुक, व्हॉट्स अँप यासह अन्य कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांच्या जाहिराती अथवा इतर मजकूर प्रसिद्ध करताना परवानगी घ्यावी लागणार आहे. विना परवानगी अशाप्रकारे काही बाबी प्रसिद्ध झाल्या, तर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात येणार आहे.सध्या तरुणाईमध्ये सर्वाधिक मोठय़ा प्रमाणात व्हॉट्स अँप व फेसबुक हा सोशल मीडिया वापरला जात असून, व्हॉट्स अँपचे तर अनेक ग्रुप तयार करून त्याद्वारे आपा पल्या प्रभागातील उमेदवारांचे कौतुक करण्याबरोबरच त्यांना निवडून देण्याचे आवाहनही केले जाण्याची शक्यता असते. याशिवाय फेसबुकवरूनही अशाच प्रकारे प्रचाराची यंत्रणा राबविली जाईल. निवडणुकीचा ज्वर चढला असल्याने आतापासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची यंत्रणा राबविणे सुरू झाले आहे. या प्रचार यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन केले आहे. त्यानुसार या सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर सेलच्या परवानगीशिवाय उमेदवाराच्या सर्मथनातील अथवा विरोधातील एखादी पोस्ट प्रसिद्ध केल्यास अशांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.उमेदवारांनाही भोगावे लागणार परिणामसर्वत्र नगरपालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान होत असून, दरम्यान एकमेकांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांचे सर्मथन व विरोध हा सोशल मीडियावरुन अधिक प्रमाणात सुरु होईल. काही उमेदवारांचे अकाउंट जरी त्यांचे असले, तरी त्याची हातळणी बरेचदा त्यांचे सर्मथकच करतील. या सर्मथकांकडून एखादी चुकीची गोष्ट घडल्यास त्याचे परिणाम उमेदवारांना भोगावे लागणार असल्याने उमेदवारांनाही आता काळजी घ्यावी लागणार आहे.