शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

स्मार्ट फोनसाठी मोलमजुरी!

By admin | Updated: May 25, 2014 00:04 IST

युवक अँन्ड्रॉईड मोबाईल खरेदीसाठी मोलमजुरी करत आहेत.

शेगाव : दिवसेंदिवस शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे मोठय़ा प्रमाणात पसरत असताना ग्रामीण भागात इंटरनेट वापरणार्‍या युवकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. पालकांकडून काहीही कारणे सांगून किंवा इतर उलाढाली करून युवक अँन्ड्रॉईड मोबाईल खरेदीसाठी मोलमजुरी करत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी इंटरनेटचा निकाल आणि इतर माहिती मिळविण्यासाठी शहरात इंटरनेट कॅफेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नव्हता. सायबर कॅफेत तासनतास चॅटिंग करणार्‍या युवक-युवतीही आता घरबसल्या मोबाईलवर दहा रुपयांपासून ते २00 रुपयांपयर्ंतचे रिचार्ज मारून तो संपेपयर्ंत चॅटिंग करण्यात मग्न आहेत. व्हॉटस्अँप, फेसबुकसाठी चांगला मोबाईल असावा, असे प्रत्येक युवक-युवतीला वाटत असल्याने अगदी पालकांना काहीही कारणे सांगून तसेच युवक वर्ग बांधकामावर गवंड्याच्या हाताखाली मोलमजुरी करून तर इतर ठिकाणी हमाली आणि बिगारी काम करीत आहेत.