शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही पाणीटंचाईचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:16 IST

अशोक इंगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तब्बल दोन महिने होऊनही सिंदखेडराजा तालुक्यात एकाही तलावात पाण्याचा मुबलक साठा नसल्याने पाणटंचाईचे सावट कायम आहे. आजपर्यंत फक्त ३०२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.सिंदखेडराजा तालुक्यात एकूण सात महसूल मंडळे आहेत. त्यात शेंदुर्जन, साखरखेर्डा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगावराजा, सोनुशी आणि सिंदखेडराजा मंडळाचा समावेश आहे. या सात ...

ठळक मुद्दे३०२ मि.मी. पावसाची नोंद : तलाव कोरडेच! सिंदखेड राजा तालुक्यातील स्थिती

अशोक इंगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तब्बल दोन महिने होऊनही सिंदखेडराजा तालुक्यात एकाही तलावात पाण्याचा मुबलक साठा नसल्याने पाणटंचाईचे सावट कायम आहे. आजपर्यंत फक्त ३०२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.सिंदखेडराजा तालुक्यात एकूण सात महसूल मंडळे आहेत. त्यात शेंदुर्जन, साखरखेर्डा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगावराजा, सोनुशी आणि सिंदखेडराजा मंडळाचा समावेश आहे. या सात मंडळात केशव शिवणी, बुट्टा तांडा येथील विद्रुपा आणि राजेगाव ही धरणे मोठी आहेत. त्याचबरोबर हनवतखेड, हिवरा गडलिंग, साखरखेर्डा येथील महालक्ष्मी, गायखेडी, सिंदखेडराजा येथील चाँदणी तलाव, मोती तलाव यासह पाटबंधारे विभाग, सिंचन विभाग आणि जिप पाटबंधारे विभागाची पाझर तलाव आहेत. जून महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडल्यानंतर कोरडी पडलेली तलावाची पातळी ५ ते १० टक्क्याने वाढली.परंतु मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने झपाट्याने पाणी पातळी घटून सर्वच तलावांनी पातळी गाठली आहे. काही तलावातून नळयोजनेला पाणीपुरवठा केला जातो. ह्या नळयोजना शेवटच्या घटका मोजत आहेत. यावर्षी शेंदुर्जन मंडळात ३९२.२ मि.मी. ही सर्वाधिक पावसाची नोंद असून, मलकापूर पांग्रा मंडळात ३४४.९ मि.मी., सोनुशी मंडळात ३०२.०४ मि.मी., किनगावराजा मंडळात २९६ मि.मी., सिंदखेडराजा मंडळात २८३.४ मि.मी., साखरखेर्डा मंडळात २६८.२ मि.मी. आणि सर्वात कमी दुसरबीड मंडळात २३२ मि.मी. पावासाची नोंद झालेली आहे. तालुक्याची पावसाची सरासरी ३०२.०७ मि.मी. असून, मागील वर्षी पेक्षा कमी आहे. जुलै महिन्यात एकदाही दमदार पाऊन न पडल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधलेली सर्व कट्टे, बंधारे कोरडीच आहेत.