शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने दसरा उत्सव साजरा

By admin | Updated: October 13, 2016 02:09 IST

गतिमंद विद्यार्थ्यांनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम.

गजानन कलोरे शेगाव, दि. १२-श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने ११ रोजी आनंद विसावा मैदानावर याहीवर्षी पारंपरिक पद्धतीने व गतिमंद विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री शिवशंकरभाऊ पाटील व शहरवासीयांच्या उपस्थितीत दसरा उत्सव साजरा करण्यात आला.श्रींची पालखी मंदिरातून दु.४ वा. रथ, मेणा, गज व अश्‍वासह सीमोल्लंघनाकरिता मार्गस्थ झाली. आनंद विसावा परिसरातील भव्य मैदानावर सायंकाळी पालखी पोहोचली. अत्तराने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यानंतर श्री गजानन महाराज संस्थानच्या गतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना नृत्य, ह्यशेतकरी नृत्यह्ण, ह्यसमूह नृत्यह्ण विठ्ठल दर्शन समूहनृत्य, जगदंब जगदंब आई तुळजाभवानी समूह नृत्य, अशा प्रकारची नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. गेल्या २८ वर्षांपासून श्री गजानन संस्थानच्यावतीने या मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रींच्या पालखी समवेत सहभागी टाळकरी यांनी ह्यआई साहेबांचा जोगवाह्ण याप्रसंगी पावलीसह सादर केला. यावेळी श्रींची आरती व देवीची आरती करण्यात आली व पारंपरिक पद्धतीने आपट्याच्या झाडाच्या फांद्याची (सोन्याची) पूजा करण्यात आली व उपस्थित नागरिकांनी सोने लुटले.श्रींच्या मुखवट्याचे व दुर्गादेवीच्या प्रतिमेचे भक्तांनी रांगेत शिस्तीने दर्शन घेतले. याप्रसंगी शहर तसेच बाहेरगावातील भाविकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील, नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्रींची पालखी सायंकाळी मंदिरात पोहोचल्यानंतर याठिकाणी महाआरती करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.