शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची उडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 12:10 IST

Gram Panchayat election : शिवसेनेचे सरपंच, उपसरंपच अधिक कसे होतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ऐरवी कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून बघितल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने उडी मारली असून, राजकारणाचा पाया म्हणून पाहल्या जाणाऱ्या या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी अधिक लक्ष घालून शिवसेनेचे सरपंच, उपसरंपच अधिक कसे होतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत. तसे ग्रामपंचायत निवडणुकीत थेट पक्षाचा सक्रिय सहभाग कमी असतो. गावातील गटातटाच्या राजकारणामुळे आपल्या प्रतिमेला धक्का लागणार नाही, याची काळजी खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य घेत असतात. मात्र यावेळी जिल्ह्यात होत असलेल्या ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने अधिक रस घेतल्याचे समोर येत असून, २५ डिसेंबर रोजी खुद्द खासदार प्रतापराव जाधव यांनी यासंदर्भाने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाधिक ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे कसे वर्चस्व राहील या मुद्द्यावर मंथन केले. बुलडाणा येथे झालेल्या शिवसेनेच्या या बैठकीस पंचायत समितीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख तथा बाजार समिती सभापती जालिंदर बुधवत, जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, बळीराम मापारी, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव, मुंबई बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, जिल्हा परिषदचे सभापती राजेंद्र पळसकर, बाबूराव मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवेसना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका अधिक गांभिर्याने घेतल्या असून, या माध्यमातून शिवसेनेचे ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण करण्यासोबतच संघटनात्मक बांधणीसाठीही या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. शिवसेनेचे प्राबल्य वाढविण्यासाठी या निवडणुका अधिक गांभीर्याने घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले. सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना