शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णाच्या कालव्यात पडून मेंढपाळाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 11:25 IST

Buldhana News किसन शेळके (३८)  हे खडकपूर्णाच्या कालव्यालगत पाणी पिण्यासाठी गेले होते. 

ठळक मुद्देखडकपूर्णा प्रकल्पाच्या मोठ्या कालव्यात ही दुर्घटना घडली.पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर मृतक कारभारी शेळके याचा मृतदेह सापडला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका मेंढपाळाचा पाय घसून तो कालव्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. प्रकरणी अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पिंप्री आंधळे शिवारातून जाणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या मोठ्या कालव्यात ही दुर्घटना घडली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या वडाळा वळसा येथील कारभारी किसन शेळके व शंकर गुणाजी सोरमारे हे मेंढपाळ सध्या अंढेरा परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आलेले आहेत. दरम्यान त्यांनी त्यांच्याकडील एक बोकड विक्री करून मद्यप्राशन केले होते. दरम्यान १८ फेब्रुवारीला अंढेरा तथा पिंप्री आंधले परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होत होती.  या कालावधी दरम्यानच कारभारी किसन शेळके (३८)  हे खडकपूर्णाच्या कालव्यालगत पाणी पिण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांचा पाय घसरून ते कालव्यात पडले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पिंप्री आंधळे शिवारातील नागरिकांनी याची माहिती ठाणेदार राजवंत आठवले यांना दिली. त्यावेळी पावसातच त्यांनी व त्यांचे सहकारी उगले, समाधान झिने यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून कारभारी शेळके यांचा शोध घेतला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक होता. त्यामुळे त्यांनी खडकपूर्णाच्या अभियंत्यांना कालव्याचे पाणी बंद करण्यास सांगितले. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर मृतक कारभारी शेळके याचा मृतदेह सापडला. शवविच्छेदनासाठी त्याचे पार्थिव शुक्रवारी चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर ते मृतकाच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास बीट जमादार वाघ हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर