शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

थेट निवडीने सरपंच पदाला ‘ग्लॅमर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:56 IST

राजकारणात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे वा तरुणांनी नेतृत्व करावे, असली विधाने अनेक भाषणांमधून नेहमी ऐकाला मिळतात; परंतु प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा मात्न तरुणांना किती संधी दिली जाते, हे सर्वo्रृत आहे; मात्र आता थेट जनतेतून सरपंच निवडीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना राजकारणात दमदार ‘एंट्री’ मारण्याची व गावाचे नेतृत्व करण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली असल्याने तालुक्यात होऊ घातलेल्या २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तरुण वर्ग सरसावला आहे.

ठळक मुद्देचिखली तालुक्यात २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर तरुणाई सरसावली!

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: राजकारणात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे वा तरुणांनी नेतृत्व करावे, असली विधाने अनेक भाषणांमधून नेहमी ऐकाला मिळतात; परंतु प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा मात्न तरुणांना किती संधी दिली जाते, हे सर्वo्रृत आहे; मात्र आता थेट जनतेतून सरपंच निवडीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना राजकारणात दमदार ‘एंट्री’ मारण्याची व गावाचे नेतृत्व करण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली असल्याने तालुक्यात होऊ घातलेल्या २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तरुण वर्ग सरसावला आहे. तर नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता जुन्या नेतृत्वापेक्षा तरुणांमध्येच अधिक आहे. शिवाय तरुणांमध्ये योग्य ‘टॅलेंटही’ असल्याचे सर्वसामान्य ग्रामस्थांनाही आता कळायला लागले आहे. त्यामुळे गावपतळीवर तरुणांच्या नेतृत्वास जनाधारदेखील मिळत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या गावांत हय़ा निवडणुका होणार आहे त्या-त्या गावात राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सरपंच पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षाणानंतर काहींचा हिरमोड झाला असला तरी आरक्षण व निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खर्‍या अर्थाने गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, मोर्चेबांधणीस आलेला वेग पाहता बहुतांश गावांत चुरशीच्या लढतीचे संकेत आहेत. तर सुशिक्षित तरुणांमध्ये राजकारणातील भ्रष्टाचार आणि इतर कुरापतीबाबत तिरस्कार असला तरी ग्रामविकासाबाबत तो सजग असल्यामुळे प्रत्यक्षात स्वत: राजकाराणात उतरून सकारात्मक बदल घडवून आणण्याची त्यांच्यात प्रचंड ओढ असल्याने उच्चशिक्षित, गावाच्या प्रत्येक निर्णयात सहभाग घेणारा तरुण वर्ग या निवडणुकीत रिंगणात प्रत्यक्ष उतरण्यासाठी सज्ज झाला असल्याने या निवडणुकांबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे निवडणुकीचे वारे वाहणार्‍या तालुक्यातील २८ गावपातळीवरील ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांकडून व्यूहरचना आखण्यास सुरुवात झालेली आहे. राजकीयदृष्ट्या गतवेळी बहुतांश ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे प्राबल्य होते; मात्र मध्यंतरी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. तर भाजपाने या निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारली असल्याने आजरोजी भाजप व काँग्रेस दोन पक्ष तुल्यबळ स्थितीत आहेत. तर इतर प्रमुख पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचाही ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.याशिवाय थेट सरपंच निवडणुकीमुळे उमेदवारांना आता संपूर्ण गावच्या मतदारांपर्यंत पोहचावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मोठा खर्चदेखील करावा लागणार असल्याने थेट सरपंच पदाची निवडणूक लढविणे आर्थिकदृष्ट्या सोपे राहीले नाही. त्यासाठी सुशिक्षित, सामाजिक क्षेत्नात कार्यरत असणार्‍या उमेदवारांबरोबरच मातब्बर उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच थेट सरपंच निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. विशेष बाब म्हणजे थेट जनतेतून होणार्‍या या निवडीमुळे सरपंच पदालाही चांगलेच ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले असल्याने ग्रामीण भागातील युवक वर्ग या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सरसावला आहे. सरपंच पदासाठी जनतेतून कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून, निवडणुका अजून तीन महिन्यांवर असल्या तरी गावागावांत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  

गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षणतालुक्यातील २८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यामध्ये समाविष्ट गावे व सरपंचद पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. मोहदरी (ओबीसी),  सोनेवाडी (सर्वसाधारण महिला), डासाळा (अनु. जाती महिला), आंधई (ओबीसी), पिंपरखेड (सर्वसाधारण),  सावंगी गवळी (सर्वसधारण), किन्ही सवडद (अनु. जाती महिला), करतवाडी (ओबीसी), पाटोदा (सर्वसाधारण महिला),  कव्हळा (अनु.जाती), महिमळ (ओबीसी महिला),  मुंगसरी (सर्वसाधारण), बोरगाव वसू (सर्वसाधारण), धोडप (अनु.जाती महिला), उंद्री (अनु.जाती), सातगाव भुसारी (सर्वसाधारण), वरखेड (अनु. जाती महिला), पांढरदेव (अनु. जमाती महिला), भोकर (ओबीसी), इसरूळ (ओबीसी महिला), मिसाळवाडी (ओबीसी), रानअंत्री (सर्वसाधारण), कोनड खुर्द (अनु. जाती), चंदनपूर (सर्वसाधारण), बेराळा (अनु. जाती), भानखेड (सर्वसाधारण), गुंजाळा (सर्वसाधारण) व मनुबाई (ओबीसी) याप्रमाणे आरक्षण जाहीर असून, या २८ गावांपैकी उंद्री, ईसरूळ या मोठय़ा ग्रामपंचायती असल्याने या ठिकाणी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 

प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यातऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या एकूण २८ ग्रामपंचायती तर डिसेंबरमध्ये प्रस्तावित असलेल्या ८ अशा एकूण ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे. यानुषंगाने तहसीलदार मनीष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील निवडणूक कक्ष सज्ज असून, प्रभाग रचना, महिला व विविध प्रवर्गांचे आरक्षण, मतदार याद्या अंतिम करणे आदी प्रक्रिया पूर्ण करून या प्रभाग रचनेवरील हरकती व आक्षेपांची सुनावणीदेखील उपविभागीय अधिकार्‍यांच्या दालनात पार पडली असून, या प्रभाग रचनांवर आता यावर केवळ जिल्हाधिकार्‍यांचे शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. तर एकूण ३६ ग्रामपचायतींसाठी ११३ प्रभागातून २९८ सदस्य निवडल्या जाणार आहेत. यामध्ये खुला १३६, ओबीसी ७७, अनु.जाती ७५ तर अनु. जमाती १0 असे आरक्षण आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इच्छुक उमेदवारांना नामदनिर्देशन पत्न ऑनलाइन भरावयाचे आहे. ही सर्व प्रकिया नवीन असल्याने ग्रामीण भागातील जनतेला कोणताही त्नास होणार नाही याची दक्षता तहसील कार्यालयाकडून घेतली जात आहे. याकरिता तहसीलदार मनीष गायकवाड प्रयत्नशील आहेत.