शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

शहनाज अख्तर यांच्या भजनांचा खामगावकरांना लळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:17 IST

मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करताच, उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मुस्लिम परिवारात जन्मलेल्या आणि सुप्रसिध्द भजन गायिका असलेल्या शहनाज अख्तर यांनी खामगावकरांना आपल्या विविध भजनांचा अक्षरक्षा ‘लळा’ लावला. एकाहून सरस भक्तीगीतांची संहिताच हा कार्यक्रम ठरला. मुस्लिम गायिकेने आपल्या सुमधूर आवाजाने गीतं सादर केली त्यावेळी मैदानावरील अनेक हिंदू बांधवांनी भर पावसात नृत्याचा ठेका धरला.निमित्त होते ते, खामगाव येथील श्री हनुमान गणेश मंडळाने आयोजित केलेल्या भक्तीसंध्येचे. सतिफैलातील श्री हनुमान मंडळाने जबलपूर येथील प्रसिध्द भजन गायिका आणि मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांच्या ‘भगवा रंग’ ही भजन संध्येचे बुधवारी सायंकाळी आयोजित केली. स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भर पावसात ही भजन संध्या पार पडली.  ‘माता है गौरा...पिता है महेश...जय हो गणेश तेरी जय हो गणेश’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर ‘भोले हो गये टनाटन’, ‘मेरे भोले से भोले बाबा’, ‘जब श्याम मेरे सपनों मे आये’ ‘आगे बजरंगी’ अशी विविध भजनं शहनाज अख्तर यांनी गायिली. ‘मुझे चढ गया भगवा रंग’ या गीताने या कार्यक्रमाचा शेवट झाला. संचालन अ‍ॅड. अमोल अंधारे यांनी केले. प्रास्ताविक डिगांबर गलांडे यांनी केले. आभार पवन गरड यांनी मानले. यावेळी आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, नगराध्यक्षा अनिता डवरे, सागर फुंडकर, हनुमान गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा ठाकूर, नगरसेवक हिरालाल बोर्डे,  दर्शनसिंह ठाकूर, हनुमान मंडळाचे अध्यक्ष राम बोंद्रे, नगरसेविका रेखा जाधव, लता गरड, राम मिश्रा, रजपालसिंह चव्हाण यांची उपस्थिती होती.

 

सामाजिक ऐक्य परिषदेची फलश्रृती!गणेशोत्सवाच्या सुरूवातीला जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून बुलडाणा जिल्ह्यात सामाजिक ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी सामाजिक सलोखा आणि ऐक्य साधण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये सतीफैलातील श्री हनुमान गणेश मंडळाने मुस्लिम परिवारात जन्मलेल्या गायिकेची भजन संध्या आयोजित केली. या कार्यक्रमाला अनेक मुस्लिम बांधवांनीही हजेरी लावली. यामध्ये महिलांचीही उपस्थिती लक्षणिय अशीच होती.

 जय श्रीरामचा जयघोष!मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करताच, उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले. सुमधूर आवाजात हिंदू देवी-देवतांची भजनं गातानाच, आपण मंदिरातही जातो. मंदिरात जाण्यात आपल्याला कोणतेही वावडे नसल्याचे सांगतानाच, आपली लोकप्रियता ही देवीचा आशीर्वाद असल्याचीही कबुली त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :khamgaonखामगावmusicसंगीत