शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शबनम बॅग कापून अडीच लाख लंपास

By admin | Updated: November 4, 2015 02:57 IST

बसस्थानकावरील घटना; अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल.

बुलडाणा : पोलिसांचा धाक संपल्यामुळे चोरट्यांची मुजोरी वाढली आहे. जिल्ह्यात दररोज अनेक ठिकाणी चोरीच्या लहान-मोठय़ा घटना घडत असताना मंगळवारी बुलडाणा बसस्थानकावर २ लाख ४८ हजार रुपयांची रोकड अज्ञात आरोपींनी लंपास केल्याची घटना सकाळी ९.३0 वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे शहर परिसरात खळबळ उडाली आहे. बुलडाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या बुलडाणा बसस्थानकावर नेहमीच लहान- मोठय़ा चोरी, खिसे कापण्याचा घटना घडत असतात; मात्र या प्रकरणातील आरोपींना एकदाही अटक केल्याची नोंद नाही. त्यामुळे अनेक भुरटे चोर दिवसा रात्री प्रवाशांना त्रास देण्याचे काम करतात. सध्या दिवाळी सणाचे दिवस जवळ येत असल्यामुळे बसस्थानकावर गर्दी वाढली आहे. त्याचा फायदा घेत अनेक चोरटे जिल्ह्याबाहेरून आले आहेत. त्यामुळे दररोज लहान-मोठय़ा चोरीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, आज चैतन्यवाडीतील जनार्दन बाळकृष्ण पाटील वय ७५ हे २ लाख ४८ हजार रुपये रोकड शबनम बॅगमध्ये घेऊन गावाला जाण्यासाठी निघाले. सकाळी ९.३0 वाजता बसस्थानकावर पोहोचल्यानंतर ते बुलडाणा ते सोनाळा एसटी बसमध्ये चढले. यावेळी त्यांना आपल्या खांद्यावरील शबनम बॅगेतले वजन कमी वाटले असता, त्यांनी बॅगेची पाहणी केली. यावेळी त्यांना शबनम बॅग कापलेली दिसली व त्यातील २ लाख ४८ हजार रुपये लंपास झालेले दिसले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली; मात्र पैसे लंपास करणारे मिळून आले नाही. याप्रकरणी जनार्दन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एएसआय कवास करीत आहेत.