लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : भोनगाव फाट्यावरून दारूचा अवैध साठा नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून ३० जूनच्या रात्री ठाणेदार एल.के.डाबेराव यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आलेल्या सापळ्यात देशी दारूच्या साठ्यासह १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ग्रामीण पो.स्टे.चे पो.उप.नि.सुरेश रोकडे, पोहेकाँ हरिदास बोरकर, पोकॉं कैलास सुरडकर, चालक एएसआय दिलीप जाधव यांनी लावलेल्या सापळ्यात एमएच-२८/एएन-२९४८ कार जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. दारूसह १० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दारूसह दहा लाखांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 09:13 IST