शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘बेसहारा आणि मनोरूग्णांची सेवा हेच दैवी कार्य!’ - डॉ.नंदकुमार पालवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 15:08 IST

‘ सेवा संकल्प’चे संस्थापक डॉ.नंदकुमार पालवे यांच्याशी साधलेला  संवाद.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव: समाजातील संवेदनशीलता संपुष्टात आल्याने, समाजात बेसहारा आणि मनोरूग्णांची संख्या वाढत आहे. ही बाब समाजासाठी निश्चितच भूषणावह नाही. मनोरूग्णच्या सेवेतच आपणांस ईश्वराची सेवा घडते.  ‘ सेवा संकल्प’चे संस्थापक डॉ.नंदकुमार पालवे यांच्याशी साधलेला  संवाद.

‘सेवा संकल्प’ या मानवतेच्या मंदिराची संकल्पना कशी सुचली? - सन २००६-२००७ मध्ये चिखली येथे शिक्षणासाठी जात होतो. बसस्थानकावर ‘माउली’ हा मनोरूग्ण भेटायचा. त्याला आणि इतरांना जेवण आणि इतर सुविधा देत होतो. तेव्हा बेसहारा असलेल्या शर्मा आजीने जेवण आणि सर्व सुविधा देतो. निवाराही मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. मनोरूग्णांच्या प्रेरणेने ७ आॅक्टोबर २०१२ रोजी ‘सेवा संकल्प’ची मुहूर्तमेंढ रोवल्या गेली. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते या सेवाभावी प्रकल्पाला सुरूवात झाली.

 ‘सेवा संकल्प’मध्ये सद्यस्थितीत रूग्णांची संख्या किती?- समाजातील बेवारस, दिव्यांग, मनोरूग्ण अनाथ आणि एचआयव्ही बाधीत थोडक्यात समाजातील उपेक्षीत व्यक्ती हाच ‘सेवा संकल्प’चा प्रमुख घटक आहे. सद्यस्थितीत राज्याच्या कानाकोपºयातील ७७ रुग्ण येथे वास्तव्यास आहेत. यामध्ये मनोरूग्ण आणि बेवारस असलेल्यांचा समावेश आहे.

‘सेवा संकल्प’मध्ये आपणा कुणाची मदत मिळते?  - शिक्षण घेत असताना वयाने मोठी आणि मैत्री आणि पुढे सहचरणी असलेल्या डॉ. आरतीचे योगदान या कार्यात मोठे आहे. वडिल ज्ञानेश्वर पालवे यांनीही  या प्रकल्पासाठी १ एकर १० गुंठे जमीन दिली. तेथेच सन २०१५ मध्ये सेवा संकल्प परिवार वसला आहे. आई आणि मुलगा रूद्र याच्यासह काही स्वयंसेवक मोलाची मदत करतात.

थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्यामते मनुष्य विचारी असला की, गुंतलेला राहतो. याउलट ‘अविचारी’ व्यक्ती आपले ध्येय सिध्दीस नेण्यासाठी प्रयत्नशील राहतो. ‘सेवा संकल्प’चा कोणताही संकल्प केला नव्हता. मात्र, एका मनोरूग्णाच्या प्रेरणेतून समाजाची सेवा करण्याची संधी मिळतेय. 

मनोरूग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल आपले मत काय?- समाजातील एकलकोंडे पणा आणि कुटुंब व्यवस्थेचा ºहास ही दोन प्रमुख कारणं समाजातील मनोरूग्णांच्या संख्येत भर घालताहेत, असे आपले प्रामाणिक मत आहे. मनोरूग्ण  पूर्वीही असायचे. प्रत्येक गावात तसेच वस्तीत मनोरूग्ण रहायचे. मात्र, एकत्र कुटुंब पध्दतीत त्यांना सामावून घेतले जायचे. संवेदनशीलतेने त्यांची जोपासना व्हायची. मात्र, विभक्त कुटुंब पध्दतीत ‘संवेदना’घराबाहेर फेकल्या गेल्या. मनोरूग्णांची उपयोगीता, उपद्रव्यमुल्य संपले आणि मनोरूग्ण अडगळीत पडले. विभक्त कुटुंब पध्दतीत कुटुंब लहान झाल्याने मानसिक आजारात आणि पयार्याने मनोरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत