शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशीलता जपत महिलांना सुरक्षा!

By admin | Updated: October 9, 2016 01:52 IST

महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा स्तरावर महिला सुरक्षा समिती.

ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि. 0८- पोलीस विभागाने कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह संवेदनशीलता जपत महिलांना सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा स्तरावर तसेच पोलीस ठाणे पातळीवर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या असून, पोलिसांच्या विविध समित्यांमुळे जिल्ह्यातील महिलांना सुरक्षा मिळत आहे. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणी महिला निर्धास्तपणे जाऊ शकत नव्ह त्या; परंतू गेल्या काही वर्षात पोलीस विभागाने कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह संवेदनशीलता जपत महिलांना सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महिलांवर होणार्‍या अत्याचाराचा निपटारा होण्यासाठी सर्व आयुक्तालय व जिल्ह्यांमध्ये घटक प्रमुखांच्या नियंत्रणाखाली मु ख्यालयाच्या ठिकाणी महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हे महिला साहाय्य कक्ष महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्या विभागातील अशासकीय संस्थाचीसुद्धा मदत घेतात. महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा, आयुक्तालय पातळीवर तसेच पोलीस ठाणे पातळीवर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हा आयुक्तालय पातळीवर समिती, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. या समितीमध्ये महिला डॉक्टर्स, महिला वकील, प्राध्यापिका तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच प्रकारे पोलीस ठाणे पातळीवर महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. अशा समित्यांमार्फत विविध कायद्यांच्या माध्यमातून महिलांच्या न्याय हक्काचे रक्षण होत असल्याने महिला निर्धास्तपणे कुठेही जाऊ शकतात. जिल्ह्यात सुरक्षा समित्यांमुळे खर्‍या अर्थाने महिलांची सुरक्षा जपली जात आहे. हुंडा पद्धत नष्ट करण्यासाठी दक्षता समित्याहुंडा पद्धत नष्ट करण्यासाठी जिल्ह्यात दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महिला व बालविकास विभागाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये हुंडा प्रतिबंधक अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा दक्षता समितीचे सदस्य असलेले पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक हे जिल्हा पातळीवर काम पाहतात. तसेच महिला सुरक्षा समितीचे सदस्य असलेले पोलीस निरीक्षक किंवा पोलीस अधीक्षक हे पोलीस ठाणे पातळीवर हुंडा प्रतिबंधक अधिकारी म्हणून नेमलेले आहेत.