शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे तपासणी अहवालास होतेय दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 10:14 IST

Khamgaon News : पेरणीपूर्वी तपासणी अहवाल मिळत नाही. यातून फसवणूक होण्याची शक्यता असते.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव  : खरीप हंगामादरम्यान बियाणे विकत घेताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी पेरणीपूर्व नमूने तपासणी अहवाल मिळाल्यास हा प्रकार रोखता येतो. मात्र, कृषी विभागाकडून नमुने पाठविण्यात दिरंगाई होते. पेरणीपूर्वी तपासणी अहवाल मिळत नाही. यातून फसवणूक होण्याची शक्यता असते. यंदाचा खरीप हंगाम तोंडावर असताना, अहवाल न मिळाल्याने शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत.  उत्पादन, साठवण, पुरवठा व विक्रीचे नियमन करण्यासाठी बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ कायद्यांतर्गत बीज परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, पेरणीसाठी शुद्ध व दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी १९६६ मध्ये बियाणे कायदा तयार करण्यात आला. या कायद्यांतर्गत बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा, बीज परीक्षण प्रयोगशाळा स्थापन झाल्या. शासनाच्या अधिपत्याखाली पुणे, औरंगाबाद, परभणी, अकोला व नागपूर येथे बीज परीक्षण प्रयोगशाळा अस्तित्वात होत्या. त्यापैकी औरंगाबाद व अकोला येथील बीज परीक्षण प्रयोगशाळा बीज गुणवत्ता तपासणी करते. बरेच शेतकरी पारंपरिक बियाणे वापरतात. मात्र, कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार तपासणीसाठी नमुने पाठवितात. त्याचा अहवाल प्राप्त होण्यास उशीर लागतो. हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी आता अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत. 

हजारो नमुने तपासणीचे आव्हानखरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी अनेक कंपन्यांकडून विविध जातींचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात, परंतु या बियाण्यांचा दर्जा कायद्यानुसार तपासणी होत नाही. कंपन्यांकडून घेतलेले बियाणे काही शेतकरी स्वत:कडे पुढील हंगामासाठी राखून ठेवतात, शिवाय गरजेनुसार इतरांनाही विकतात, पण या बियाण्यांचा दर्जा तपासला जात नाही.  

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती