शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

फलकांबाबत बियाणे विक्रेते उदासीन

By admin | Updated: June 19, 2015 02:34 IST

खामगावच्या बाजारात नियम धाब्यावर ; कृषी अधिका-यांचे दुर्लक्ष, ग्राहकांची लूट.

खामगाव : खरिपाचा हंगाम सुरू झाला असून, सर्वत्र पेरणीची लगबग उडाली आहे. पेरणीसाठी खते, बी-बियाणे घेण्याकरिता बाजारपेठेत शेतकर्‍यांची गर्दी उसळलेली आहे; मात्र खते, बियाणे यांची विक्री करणार्‍या कृषिसेवा केंद्रांवर दर व साठय़ाबाबत माहिती देणारे फलक दुर्लक्षित आहे. बियाणे विक्री कायद्यानुसार प्रत्येक कृषिसेवा केंद्रासमोर मालाचा साठा व किंमत यांचा फलक असलाच पाहिजे. तो अनिवार्य आहे. या फलकाबाबत कृषिसेवा केंद्रसंचालक मात्र कमालीचे उदासीन असल्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक लूट होत आहे. या प्रकाराकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने केंद्रसंचालकांचे चांगलेच फावले आहे. खामगाव शहरात गुरुवारी बाजाराचा दिवस असल्याने चांगलीच गर्दी होते. शहरातील सरकी लाइन, टिळक पुतळा परिसर व बाजार समिती परिसरातील कृषिसेवा केंद्रांवर पाहणी केली असता, एकाही ठिकाणी पूर्ण माहिती दिलेला फलक आढळून आला नाही. अनेक केंद्रांवर खताच्या किंवा बियाण्यांच्या पिशव्यांमागे फलक झाकले होते, तर काही दुकानांमध्ये त्यावरील माहिती अद्ययावत नव्हती. वास्तविक, हे फलक ग्राहकाला दिसतील अशा ठिकाणी आणि वाचता येतील अशा अक्षरात लिहावे, हा नियम आहे. त्याचे शहरात कुठेही पालन होताना दिसले नाही. बियाणे विक्री कायद्यानुसार फलक लावणे अनिवार्य आहे. याबाबत चालढकल होत असेल, तर कृषी केंद्रांवर कारवाई केली जाईल, असे तालुका कृषी अधिकारी एम. डी. जाधव यांनी स्पष्ट केले.

*  खुल्या बियाण्यांची चढय़ा भावाने विक्री

  कृषिसेवा केंद्रासोबत रस्त्यावर खुल्या बियाण्यांची विक्रीही जोमात सुरू असून, मूग ११0 रुपये, उडीद १२0 रुपये, तूर ९0 रुपये, तर तीळ २00 रुपये प्रतिकिलो दराने बियाण्यासाठी दिले जात आहे. या बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत मात्र कुठलीही खात्री नाही. तरीदेखील अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे.