लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: चिखली तालुक्यातील अमडापूर पो.स्टे.च्या हद्दीत येत असलेल्या पेनसावंगी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांवर चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली.जिल्ह्यातील विविध पो.स्टे.मध्ये गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी गुप्त माहितीवरून अटक करण्यास गेले होते. आरोपीने पोलीस कर्मचाºयांवर सुºयाने हल्ला करून दोन कर्मचाºयास जखमी केल्याची घटना घडली आहे.जिल्ह्याच्या विविध पोस्टेमध्ये आरोपी अंबादास मिया पवार (वय ४८ रा. पेनसावंगी) याला २८ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. विनायक कारेगावकर, पो.कॉ. नंदकिशोर धांडे, केशव नागरे हे पेनसावंगी येथे गेले होते. त्यावेळी आरोपी अंबदास पवार हा गावातील गजानन तुपकर यांच्या घरासमोरील सिमेंट रोडवर असल्याची माहिती मिळाली.आरोपीने त्याच्या कमरेमधून धारदार सुरा काढून पो.कॉ. केशव नागरे, नंदकिशोर धांडे यांच्यावर हल्ला चढवून त्यांच्या बोटांना जखमी करून धक्काबुक्की केली.सरकारी कामात अडथळा निर्माण करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीला पोलिसांनी शिताफीने पकडले. त्याच्याविरुद्ध कलम ३५३, ३३२, ३४३, भादंवि व ४/२५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपी अंबादास मिया पवार याला अटक करून पुढील तपास अमडापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उमेश भोसले पो.कॉ. सतीश नागरे, शब्बीर पटेल हे करीत आहेत. सदर घटनेची माहिती अमडापूर पो.स्टे.ला स.पो. विनायक अनंथा कारेगावकर स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांनी दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: चिखली तालुक्यातील अमडापूर पो.स्टे.च्या हद्दीत येत असलेल्या पेनसावंगी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांवर चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली.जिल्ह्यातील विविध पो.स्टे.मध्ये गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी गुप्त माहितीवरून अटक करण्यास गेले होते. आरोपीने पोलीस कर्मचाºयांवर सुºयाने हल्ला करून दोन कर्मचाºयास जखमी केल्याची घटना ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांवर चाकूहल्ला
ठळक मुद्देदोन पोलीस जखमी.