शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी सरपंचाचे ठिय्या आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर : विविध विकासकामे करताना कंबरखेड गवंढाळा येथील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन ब्लाॅक झाली आहे, त्यामुळे गावात भीषण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : विविध विकासकामे करताना कंबरखेड गवंढाळा येथील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन ब्लाॅक झाली आहे, त्यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याविषयी वारंवार निवेदने देऊनही दखल न घेतल्याने सरपंच ताई गजानन जाधव व गजानन निवृत्ती जाधव यांनी एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता अधिकारी उदय भरडे यांचा खुर्चीला रिकाम्या बाटल्या व बांगड्यांचा हार घालून निषेध केला.

ए़. जी़. कन्स्ट्रक्शन, औरंगाबाद यांनी गवंढाळा गावातील सिमेंट नाल्याचे बांधकाम, शेतकऱ्यांच्या रस्त्यावर सिमेंट पाईप आणि प्रवासी निवारा आदींचे बांधकाम केले. या बांधकामामुळे गावातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ब्लॉक झाली आहे. त्यामुळे गवंढाळा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांसह ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ९ मार्च २०२१ रोजी मेहकर - जानेफळ रस्त्यावर पाईपलाईन नवीन करून देण्यात यावी तसेच गावात झालेले पेव्हर ब्लॉकचे काम बोगस करण्यात आले आहे, त्याची चौकशी करून बसवलेले पेव्हर ब्लॉक काढून पुन्हा नवीन बसविण्यात यावेत, या मागणीसाठी आंदाेलन केले हाेते. त्यावेळी एमएसआरडीसीचे अधिकारी दिनकर शिंदे आणि नमन शिंदे यांनी गावातील प्रश्न लवकर मार्गी लागतील, असे लेखी आश्वासन पूर्ण करताना रस्ता करुन दिला होता. त्यामुळे रास्ता राेकाे आंदाेलन मागे घेण्यात आले हाेते. त्यानंतर पुन्हा १६ एप्रिल राेजी एमएसआरडीसीचे बरडे यांना निवेदन दिले. यापूर्वीही ग्रामपंचायतीने निवेदन दिले हाेते. या सर्व कामासंदर्भात गजानन जाधव आणि सरपंच ताई जाधव यांनी ठिय्या आंदाेलन केले. कार्यालयात कुणीही नसल्याने कार्यकारी अभियंता भरडे यांच्या रिकाम्या खुर्चीला बाटल्यांचा हार घालून ठिय्या आंदोलन सुरु केले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली नाही.