शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
4
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
5
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
6
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
7
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
8
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
9
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
10
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
11
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
12
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
14
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
15
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
16
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
17
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
18
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
19
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
20
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गावगुंड पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST

बुलडाणा : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी बुलडाणा पोलीस वेगवेगळे ऑपरेशन राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून ...

बुलडाणा : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी बुलडाणा पोलीस वेगवेगळे ऑपरेशन राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले किंवा दोष सिद्ध झालेल्या गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवून प्रतिबंधित करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी पाउले उचलली आहेत. अशा गुन्हेगारांची ‘कुंडली ’ गोळा करण्याचे काम सुरू असून, आता हे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडावर आले आहेत.

धार्मिक सण उत्सव काळात जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, सोबतच शहर आणि गावाची शांतता भंग होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्यासह सर्वच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गावगुंड आणि सराईत गुन्हेगारांची माहिती गोळा करीत आहेत. या गावगुंडावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्या गुंडांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून,काहींना तडीपार करण्यात आले आहे. तर अनेकांना पुढील काही दिवसांतच जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

१७ गुन्हेगारी टोळ्यांवर केली जाणार कारवाई

मुंबई पोलीस कायदा १९५१ कलम ५५ नुसार जिल्ह्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दीपार करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील १७ गुन्हेगारी टोळ्यांना प्रतिबंधित करण्याची प्रक्रिया सुरू असून, या टोळ्यांची चाचपणी केली जात आहे. तर ज्या पोलीस स्टेशन हद्दीत या टोळ्या येतात त्या पोलीस स्टेशनचे पोलीस अशांवर टोळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

हे गुन्हेगार आहेत पोलिसांच्या हिटलिस्टवर

मिळालेल्या माहितीनुसार, शरीर आणि मालमत्तेचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले १५० गुन्हेगार, तर गुन्हा करून दोषसिद्ध झालेले ७५ गुन्हेगार, यासोबतच दारुचे दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले ३२६ जण, तर गुन्हे केले आहेत मात्र, ते मोकाट फिरत आहेत असे ५२ गुन्हेगार तर कलम ११० अन्वये दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले ४०० गुन्हेगार बुलडाणा पोलिसांच्या रडावर असून, यातील अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर पुढील काळात यातील अनेकांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.

९ झोपडपट्टी दादांची केली जात आहे कुंडली तयार

महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याच्या कायद्यांतर्गत (एमपीडीए) जिल्ह्यातील ९ झोपडपट्टी दादाही पोलिसांच्या रडावर आहेत. या गुन्हेरांचाही कुंडली गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यातील चिखली येथील एकावर कारवाई झाली असून, उर्वरिताना स्थानबद्ध केले जाणार आहे.

अनेक सराईत गुन्हेगारांची माहिती गोळा झाली असून, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. तर पुढील काही दिवसांत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे.

-बळीराम गिते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.