शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा अभयारण्यात स्वच्छता अभियान

By admin | Updated: June 5, 2017 02:28 IST

जागतिक पर्यावरण दिन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा-खामगावदरम्यान असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, ४ जून रोजी वन्यजीव सोयरे यांनी स्वच्छता अभियान राबवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.ज्ञानगंगा अभयारण्यातून रस्त्याने जाताना अनेक लोक दारूच्या काचेच्या शिश्या या जंगलाच्या कडेला फेकतात. काही मंडळी जंगलातच बसून अनेकदा दारू पितात आणि दारू िपणे झाले की लगेच जाताना त्या दारूच्या काचेच्या बाटल्या तेथेच लांब जंगलात फेकतात. ज्ञानगंगा अभयारण्यातून जात असताना अनेक ठिकाणी दर दोन, तीन फुटावर दारूची काचेची बाटली रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहावयास मिळते. यातील अनेक काचेच्या बाटल्या ह्या ज्ञानगंगा अभयारण्यात फुटून त्याचे तुकडे इकडे तिकडे पडलेले असतात. काचेचा तुटलेला छोटासा तुकडा पायात रुतला, तर आपला पाय रक्तबंबाळ होतो, ही सत्यता आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात या फुटलेल्या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे वन्य जीवास धोका आहे. या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे आतापयर्ंत कितीतरी वन्य जीवांना इजा झाल्या असतील. त्या मुक्या वन्य जीवांच्या शरीरातून ही रक्तस्राव झाला असेल. मुक्या वन्य जीवांना इजा झाल्यावर ते बिचारे सांगणार कोणाला? त्यांचा उपचार करणार कोण? परंतु जंगलातील मुके वन्य जीव तशाच जखमा घेऊन आपले जीवन जगतात. या छोट्या-छोट्या काचेच्या बाटलीच्या जखमामुळे अनेक वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. या वन्य जीवांना आतापयर्ंत झालेल्या जखमांचा उपचार आपण करू शकत नाही; परंतु या दारूच्या काचेच्या बाटल्यांपासून भविष्यात होणार्‍या इजा थांबवू शकतो. याचा विचार करून वन्य जीव सोयरे, बुलडाणा यांनी मागील वर्षी ५ जून २0१६ रोजी मोहीम आखून ज्ञानगंगा अभयारण्यातून ३५ पोते दारूच्या काचेच्या व प्लास्टिक बाटल्यांचा कचरा जमा केला होता.