जळगाव जामोद : लोकमत सखी मंच युनिट जळगाव जामोदच्यावतीने श्रावण सोमवारचे औचित्य साधून सातपुडा पर्वतरांगेत एकदिवसीय ह्यसखी रंगे निसर्गा संगेह्ण सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सखींनी स्वत:चा कलाविष्कार सादर करीत निसर्गाचा आनंद घेतला. मध्यप्रदेश व महाराष्ट्राची सीमा असलेल्या तीन खुटी परिसराची पाहणी करुन सखींनी निसर्गाविषयी माहिती घेतली. त्यानंतर पर्वतावरील वनविभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या टॉवरवर चढून सखींनी संपूर्ण सातपुड्याचे निरिक्षण केले. आमपाणी परिसरात सोबत आणलेले डबे एकत्र करुन स्नेहभोजन घेतले. त्यानंतर झिम्मा फुगडी, झोके घेणे, गाण्यांच्या भेंड्या, नृत्य, गाणी आदी कार्यक्रम घेवून दहीहांडी फोडली. ही दहीहंडी डोळ्याला पट्टी बांधून मनिषा चव्हाण यांनी फोडली. त्यानंतर गोपाळकाला करुन तो सर्व सखींना वितरीत करण्यात आला. यावेळी गोडाडा धरणालाही सर्व सखींनी भेट दिली. निसर्गाच्या सानिध्यात सखींनी एक दिवस आनंदात घालविला. या सहलीप्रसंगी झालेल्या विविध स्पर्धामध्ये वंदना कांडलकर, अपर्णाताई कुटे, प्रिती गट्टाणी, सविता देशमुख, रेखा अवचार, मंजुश्री लहासे, रमा राठी, शैलजा पवार, कल्पना हागे, मनोरमा राठी, विणा टावरी, वंदना चव्हाण, मनिषा चव्हाण, आशा उमाळे, आसावरी सराफ, जिजाबाई पवार, सुनिता पाटील, सरिता देशमुख, ज्योती गावंडे, रेणू गावंडे, मृदुला गावंडे, विद्या देशमुख, संध्या गायगोळ, अर्चना ठोंबरे, मीनल गोगटे, प्रतिभा चव्हाण, गंगुबाई खोंड, स्वाती अढाव, लता अटक, सुचिता देशमुख व श्रृती देशमुख यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाला वनपरिक्षेत्राधिकारी डी.एस.काळे, ठाणेदार एम.एस.भोगे, वनरक्षक पुंसे व पारधी आणि प्रा.ऋषिकेश कांडलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
लोकमत सखी मंचची ‘सखी रंगे निसर्गा संगे’ सहल
By admin | Updated: August 21, 2014 00:12 IST