शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

‘बुलडाणा अर्बन’ लावणार रस्त्याच्या दुतर्फा लॉन!

By admin | Updated: July 13, 2016 02:08 IST

बुलडाणा शहराचे सौंदर्यीकरण; नागरिकांना मिळणार वॉकिंग ट्रॅकची सुविधा.

बुलडाणा : 'स्वच्छ शहर सुंदर शहर' ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी नेहमीच आगळेवेगळे व लोकोपयोगी आकर्षक आणि आधुनिक प्रकारचे उपक्रम राबविणार्‍या बुलडाणा अर्बन संस्थेने बुलडाणा शहरात रस्त्याच्या दुतर्फा कमी पाण्यात विकसित होणारी लॉन लावण्याचा निर्णय घेतला असून या कामाला युध्दपातळीवर सुरुवात करण्या त आली आहे. दरम्यान या हिरव्यागार लॉनमुळे शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.बुलडाणा अर्बन संस्थेने बुलडाणा शहराच्या सौंदर्यीकरणाअंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा कमी पाण्यात वाढणारी लॉन लावण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यास सहाय्यभूत ठरणारी ही लॉन कमी पाण्यात वाढते सदर लॉनच्या बिया म्हैसूर विद्यापीठात विकसीत करण्यात आल्या आहेत. सदर बियांची लागवड करण्यासाठी बुलडाणा अर्बन संस्थेने तिस हजार रुपये खर्च करुन स्वबनावटीचे विशिष्ट प्रकारचे कल्टीवेटर यंत्र विकसीत केले आहे. सदर लॉन शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली आहे. कमी पाण्यात विकसीत होणार्‍या या लॉनमुळे बुलडाणा शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या माध्यमातून नागरिकांना वॉकींग ट्रॅक म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला या लॉनचा उपयोग करण्यात येणार या लॉनमुळे होणारे चिखल, गारा व दलदल कमी होण्यास मदत होते परिणामी नागरिकांना पायी चालणे सुलभ होणार आहे. आणखी काही दिवस वरुणराजाची कृपा राहिली तर येत्या पंधरा दिवसात ही लॉन पुर्णपणे विकसीत होणार आहे. बुलडाणा शहरातील नागरी वस्त्यांमधील रस्त्यांच्या दुतर्फा या लॉनच्या बिया टाकण्यात येणार असून नागरिकांनी या लॉनची सुरक्षितता राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना आपल्या घरासमोर कमी पाण्यात उगविणारी लॉन लावावयाची असेल तर त्यांना बुलडाणा अर्बन सेफ्टी अँण्ड सिक्युरीटी कार्यालयात लॉनच्या बिया व कल्टीवेटरची सुविधा मिळणार आहे. इच्छूकांनी सदर बिया घेवून जाव्यात असे आवाहन ही करण्यात आले आहे.