शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून जाणा-या रस्त्याची अवस्था बिकट

By admin | Updated: July 12, 2016 00:49 IST

राज्य महामार्गावर खड्डय़ात केला बैठा सत्याग्रह!

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा): बेराळा ते जालना १७६ राज्य महामार्ग रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे. देऊळगाव राजा शहरातून जाणार्‍या मार्गावर शेकडो खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे शहरातील संघर्ष ग्रुपच्यावतीने सोमवारी रस्त्यातील खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले. सततच्या वर्दळीने या खड्डय़ांचे आकारमान वाढत आहे. यामध्ये बहुतांश खड्डे एक ते दोन फूट खोल आहेत. यात पाणी साचून राहिल्याने खड्डय़ाच्या नेमका अंदाज येत नसल्यामुळे अनेकदा वाहनाचा अपघात घडत आहे. या मार्गाने प्रवास करणे म्हणजे जिवंतपणीच मरणयातना केल्याचा प्रत्यय येतो. याकरिता शहरातील संघर्ष ग्रुपचे प्रभाकर मान्टे खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केले. जालना ते बेराळा फाटा हे अंतर ७८ कि.मी.चे चौपदरी करणाचे कामाचे निविदा के.टी. कन्स्ट्रक्शन इंदूर यांची शासन स्तरावर मंजूर झाल्याने नोंव्हेबर २00९ मध्ये त्यांना काम सुरु करण्याचा आदेश देऊन २४ महिन्यांचे मुदत देण्यात आली होती. नोंव्हेबर २0११ पर्यंंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मग के.टी. कन्स्ट्रक्शन यांचे खासगी अडचणीमुळे ही एजन्सी चौपदरी तर सोडाच एका बाजूने दोन पदरी रस्ता सुद्धा पूर्ण करु शकली नाही. हे काम वेळेच्या आत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी सा.बां. विभागाची असतानासुद्धा त्यांनी या गोष्टीकडे कानडोळा केला. यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने, हे काम थंड बस्त्यात पडलेले आहे. आजरोजी देऊळगावराजा शहरातून जाणार्‍या रस्त्याची दुदर्शा अत्यंत खराब झाल्याने अपघात होण्याची भीती निर्माण होते आहे. अनेक नागरिकांना जिवास मुकावे लागत आहे. या मार्गावर शाळा, महाविद्यालय, दवाखाने, पेट्रोल पंप असल्याने आपघात होण्याची शक्यता नकारता येत नाही, म्हणून स्थानिक संघर्ष ग्रुपचे प्रभाकर मान्टे यांनी खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केले. दोन तासांत बांधकाम विभागाला जाग आली. शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली.