शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते बनलेत मृत्यूचे सापळे

By admin | Updated: May 12, 2015 00:07 IST

बुलडाणा (जि. बुलडाणा)-औरंगाबाद राज्य महामार्गावरील पुल क्षतिग्रस्त.

धाड : बुलडाणा -औरंगाबाद या राज्य महामार्गावरील धाडजवळ नदीनाल्यावर असणारे पूल अपघातास आमंत्रण देणारे बनल्याने तात्काळ दुरूस्तीची मागणी होत आहे. काही पुलाची मोठी बिकड अवस्था झाली आहे. त्यामुळे येणार्‍या पावसाळ्यात वाहतूकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. धाडमधून औरंगाबादकडे जाणार्‍या रस्त्यावर धाडनजिक असलेला पुल पुर्णत: खचला असून त्याच्या दोन्ही संरक्षक बाजू तुटून पडल्या आहेत. पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे करडी संग्राहक तलावाचे बँक वॉटर या पुलाखाली साचते. पावसाळ्यात पुलावरील खड्यात पाणी साचणार असल्यामुळे या पुलावर मोठय़ा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. करडी धरणामुळे हा रस्ता महावितरणच्या पॉवर हाऊसपर्यंत प्रभावीत होत असून रस् त्यालगत धरणाची पाणी साचल्याने पावसाळ्यात येथे दलदल निर्माण होते. वारंवार मोठे खड्डे पडतात. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थातुरमातूर उपाय करून रस्तादुरूस्ती करण्यात येते. परिणामी या रस्त्यावरील अपघाता त अनेकदा मोठी हानी झाली आहे. अशीच अवस्था धाडमधून जामठीकडे जाणार्‍या रस्त्याची असून हा संपूर्ण रस्ता उखडला आहे. नालीवर असलेल्या पुलांना भगदाड पडले आहे.