शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचे कधी राईट तर कधी लेफ्ट, पळवापळवीने प्रवाशांचा वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST

बुलडाणा : बाहेरगावावरून शहरात प्रवेश करताना प्रथम प्रवाशांची भेट रिक्षाचालकांशी होते. प्रत्येक प्रवाशाला शहर अनोळखी असल्याने प्रवासी रिक्षाचालकाने सांगितल्यानुसार ...

बुलडाणा : बाहेरगावावरून शहरात प्रवेश करताना प्रथम प्रवाशांची भेट रिक्षाचालकांशी होते. प्रत्येक प्रवाशाला शहर अनोळखी असल्याने प्रवासी रिक्षाचालकाने सांगितल्यानुसार रिक्षाचे भाडे द्यायला तयार होतो. याचा फायदा घेत काही रिक्षाचालक अनाेळखी प्रवाशांकडून जादा दर आकारत असल्याचे चित्र आहे.

साधारणत: बसस्थानक, जांभरून राेड, जयस्तंभ चाैक, आठवडी बाजार, चिखली राेड या ठिकाणी रिक्षांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. यातील बसस्थानकाजवळ रिक्षाचालकांची अक्षरश: स्पर्धा असते. प्रवासी उतरला की त्याला हेरण्यासाठी रिक्षाचालक त्यांच्या मागे-पुढे येतात. यामुळे प्रवासीही भांबावून जातात. अनेकजण वाटेल तेवढे दर सांगतात, तर काहीजण वाजवी दर सांगतात. मात्र, वाजवी दर सांगणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. यातून प्रवासी मात्र नाडवला जात आहे.

बसस्थानक

शहरातील बसस्थानकाच्या परिसरात रिक्षाचालकांची गर्दी असते. बसमधून उतरलेला प्रवासी आपल्यालाच मिळावा, यासाठी अनेक वेळा रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा असते. याच ठिकाणी ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारे ऑटाेही उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण हाेताे.

भगवान महावीर चाैक

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या भगवान महावीर चाैकातही माेठ्या प्रमाणात ऑटाेचालक वाहतुकीस अडथळा करतात़ आठवडी बाजारादिवशी सर्वसामान्य नागरिकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे़

स्टेट बँक चाैक

शहरातील सर्वाधिक रहदारीचा असलेल्या स्टेट बँक चाैकातही ऑटाेचालकांची माेठी गर्दी असते़ त्यांच्यामध्ये प्रवासी घेण्यासाठी स्पर्धा असते. शासकीय कार्यालये असल्याने प्रवासी माेठ्या प्रमाणात असते़ याकडे पाेलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे़

मनमानी भाडे

शहरातील काही ऑटाेचालक मनमानी भाडे आकारत आहेत़ एरव्ही शहरात कुठल्याही भागात जाण्यासाठी प्रती प्रवासी ३० रुपये आकारण्यात येतात़

घरापर्यंत जायचे असल्याने ४० ते ६० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येते़

तसेच नवीन प्रवाशांना जादा भाडे सांगितले जाते़ शहरातील प्रवाशांना नियमित भाडे आकारले जाते़

प्रवाशांना त्रास

बसमधून उतरल्यानंतर अनेक वेळा गाेंधळ हाेताे़ कुठल्या रिक्षाचालकाला हाे म्हणायचे असा संभ्रम अनेक वेळा हाेताे़ रिक्षाचालक मनमानी दर आकारत असतात़

विजय क्षीरसागर, प्रवासी

बसस्थानक चाैकात एकाच वेळी अनेक ऑटाेचालक आवाज देत असल्याने नेमके कुणाकडे जावे, याविषयी संभ्रम हाेताे़ घरापर्यंत ऑटाे करायचा असल्यास चालक मनमानी दर आकारतात़

शरद तराळ, प्रवासी

ऑटाेवर करडी नजर

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटाेचालकांसह इतर वाहनचालकांवर वाहतूक शाखेची करडी नजर असते़ अनेक वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे़ यापुढेही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटाेचालकांसह इतर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल़

शांतिकुमार पाटील, प्रभारी निरीक्षक, वाहतूक शाखा, बुलडाणा