शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरातूनच सुरू व्हावा महिलांचा सन्मान

By admin | Updated: January 7, 2015 00:34 IST

महिला सबलीकरणात अडथळे पार करण्यासाठी लोकमत परिचर्चेत महिलांनी मांडले नवे सूत्र .

बुलडाणा : सावित्री- जिजाऊ दशरात्रोत्सव सुरू आहे. या दरम्यान महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव सर्वत्र होत आहे. हा गौरव केवळ कार्यक्रमापुरता, भाषणांपुरता नको तर आचरणात आला पाहिजे, महिलांना सन्मान देण्याची प्रक्रिया ही घरातूनच सुरू झाली तर तो संस्कार समाजापर्यंंत झिरपत जाईल व एक निकोप समाजव्यवस्था आपण देऊ शकु, त्यामुळे या दशरात्रौत्सवात महिलांना सन्मान देण्याची प्रक्रिया ही घरातूनच सुरू व्हावी, असा सूर ह्यलोकमतह्ण परिचर्चेतून समोर आला आहे.लोकमत जिल्हा कार्यालयात आयोजित या परिचर्चेत विविध क्षेत्रातील महिलांनी आपली मते परखडपणे मांडली. प्राचार्य शाहिना पठाण यांनी चर्चेची सुरुवात करताना शिक्षणाने शिक्षित झालो; पण आचरणात किती आले, असा प्रश्न उपस्थित करून पुरूषी मानसिकतेवर बोट ठेवले. काँग्रेसच्या नेत्या जयङ्म्री शेळके यांनी महिला सक्षमीकरणातील अडथळ्यांची मालिकाच विषद करून प्रत्येक घरातून सबलीकरणाची व्यवस्था सुरू झाली पाहिजे, असा आग्रही मुद्दा मांडला. जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी स्मिता तिमसे यांनी महिला म्हणजे घरातील अनपेड सर्व्र्हंंट नाहीत, त्यांनाही विचार व निर्णय स्वातंत्र्य असले पाहिजे, असे परखड मत मांडले, लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत अनेक उदाहरणे देत जिजा चांदेकर यांनी सर्व प्रकरणांच्या मुळाशी असलेली मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त केली. प्रा.संगीता काळणे यांनी आजच्या तरूण पिढीची मते स्पष्ट करून स्वातंत्र्याचा स्वैराचार न होता समानतेची व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर महिला अत्याचार निर्मूलन समितीच्या समुपदेशक दीपाली राऊत यांनी महिलांना निर्णय स्वातंत्र्य देण्याची गरज व्यक्त केली.

          तब्बल एक तास रंगलेल्या या चर्चेत महिलांनी आपली मते अधिक परखडपणे मांडली. या परिचर्चेत प्राचार्य शाहिना पठाण, महिला लोकआयोगाच्या सदस्य जिजा चांदेकर, प्रा. संगीता काळणे, समुपदेशक दीपाली राऊत, जि. परिषदेतील लेखाधिकारी स्मिता तिमसे व महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीसजयङ्म्री शेळके यांनी सहभाग नोंदविला.