शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील बियाण्यांचा अहवाल अडकला नागपूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 16:45 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील ५५० कृषी केंद्राची तपासणी करून २४३ खत, बियाण्यांचे नमुने औरंगाबाद व नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत.

- ब्रम्हानंद जाधव  बुलडाणा: बोगस, खत बियाण्यांची विक्री रोखावी, यासाठी कृषी विभागाच्या १४ पथकांकडून जिल्ह्यातील कृषी केंद्राच्या तपासणीची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५५० कृषी केंद्राची तपासणी करून २४३ खत, बियाण्यांचे नमुने औरंगाबाद व नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. त्यातील खतांच्या १९ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ९ खतांचे नमुने फेल ठरले आहेत; मात्र खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाही बियाण्यांचा अहवाल नागपूरातील प्रयोगशाळेतच अडकलेला आहे.खरीप हंगामात यंदा जिल्ह्यातील सुमारे ७ लाख ३८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होणार आहेत. त्यानुसार कृषी विभागाकडून खते व बी-बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार १ लाख ३९ हजार ४० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली असून महाबीज मार्फत ४२ हजार ८०० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यास या खते व बियाण्यांचा पुरवठा सुरू झाला आहे. कृषी सेवा केंद्रात खते, बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी येत आहेत. या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचीही शक्यता आहे. याआधी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तर काही ठिकाणी सोयाबीनचे बियाणे न उगवल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यामुळे बोगस बियाण्यांपासून शेतकºयांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. खरीप हंगामाआधीच कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. कृषी निविष्ठांच्या प्रभावी गुणनियंत्रणासाठी कार्यन्वीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय दक्षता पथक व तालुकास्तरीय दक्षता पथक अशा एकूण १४ पथकामध्ये ६९ अधिकाºयांचा समावेश आहे. या पथकांनी आतापर्यंत ५५० कृषी केंद्रांची तपासणी केली आहे. त्यातील ८७ खतांचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर १५६ बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये बियाण्यांच्या गुणवत्तेचा अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाही. खरीप हंगामासाठी लागणाºया खत बियाण्यांची खरेदी सुरू झाली असून अद्याप त्याच्या गुणवत्तेची तपासणी पूर्ण न झाल्याने शेतकºयांनी खरेदी केलेल्या कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)

पुढील आठवड्यामध्ये खत व बियाण्यांचा अहवाल औरंगाबाद व नागपूर येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त होईल. दरम्यान, शेतकºयांनी खत, बियाणे हे अधिकृत विक्रेत्याकडुनच खरेदी करावे. बियाण्याचे पक्के बिल घ्यावे, पाकिटावरील अंतीम मुदत पाहावी, बियाण्याची बॅग जपून ठेवावी, यासारखी खबरदारी शेतकºयांने घेणे आवश्यक आहे.-व्ही. टी. मुकाडे, कृषी केंद्र तपासणी मोहीम अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती