शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

चैत्र पौर्णिमेला गर्दीने फुलणारी रेणुकानगरी यंदा सुनीसुनी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:37 IST

शहराचे आराध्य दैवत रेणुका देवीच्या वासंतिक नवरात्रोत्सव व यात्रा महोत्सवानिमित्त दरवर्षी चिखलीत राज्यातील लाखो भाविक येतात. यामुळे शहरातील सर्व ...

शहराचे आराध्य दैवत रेणुका देवीच्या वासंतिक नवरात्रोत्सव व यात्रा महोत्सवानिमित्त दरवर्षी चिखलीत राज्यातील लाखो भाविक येतात. यामुळे शहरातील सर्व रस्ते गर्दीत हरवून जातात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गतवर्षाप्रमाणे यंदाही आराध्य दैवत श्री रेणुकादेवीची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासन व संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. त्यामुळे मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सव काळात दरवर्षीप्रमाणे विधिवत पूजा पार पडल्यानंतर चैत्र पौर्णिमेला सकाळी महापूजा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. प्रशासन व संस्थानच्या आवाहनानुसार मंदिरात भक्तांची वर्दळ पूर्णत: थांबली होती. नवसाचे बारागाडे, प्रदक्षिणा, विविध संस्था, संघटनांव्दारे पातळ अर्पण करण्यासाठी वाजतगाजत निघणारी मिरवणूक, चर्मकार बंधूंची चित्तथरारक जिव्हा त्रिशूलधारी मिरवणूक यंदा दिसल्या नाहीत. मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी घरोघरी भल्या पहाटेपासून देवीला नैवद्य दाखविण्यासाठी गृहिणींची लगबग दिसून आली. मंदिरात प्रत्यक्ष दर्शनास न येता आपापल्या घरी देवीच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करून प्रामुख्याने कोरोनाच्या संकटातून मुक्त करण्याची प्रार्थना यंदा केल्या गेली. सायंकाळी ७ वाजता मंदिरात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती पार पडली. त्याचवेळी भाविकांनी आपापल्या घरी देवीच्या प्रतिमेसमोर पूजा, आरती करण्यासह अंगणात दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. मंदिर परिसरातील अत्यंत तुरळक प्रमाणात भाविकांनी मंदिराबाहेरून देवीचे दर्शन घेतले.

वहन मिरवणुकीच्या परंपरेला दुसऱ्यांदा खंड!

यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण संध्याकाळी ६ वाजता व्याघ्रारूढ अशा भव्यदिव्य श्री रेणुकादेवीच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तीची वहन मिरवणूक असते. वहन मिरवणुकीची ही परंपरा यंदादेखील खंडित झाली. सायंकाळी ६ च्या सुमारास देवीच्या मुखवट्याचे पूजन करून मंदिरात आतल्या आत प्रदक्षिणा करण्यात आल्यानंतर ७ वाजता महाआरती पार पडली. सुमारे २० तास चालणाऱ्या वहन मिरवणुकीतील पारंपरिक वाद्य, वाघ्या मुरळी, कलापथक, लेझीम, टिपऱ्या पथक व प्रचंड उत्साहालादेखील यंदा खंड पडला आहे.

अत्यंत लहान आकाराच्या वगदीव्दारे प्रदक्षिणा !

चैत्रपौर्णिमेला मंदिरास वगदी प्रदक्षिणा काढण्यात येते. या वगदीला लटकून अनेकजण नवसपूर्ती करतात. मात्र, यावर्षी वगदी प्रदक्षिणेवर बंधन घालण्यात आले आहे. यावर तोडगा काढत शेलूदवासीयांनी प्रतीकात्मक लहान वगदीची निर्मिती करून मानाची वगदी प्रदक्षिणा पूर्ण केली. शेलूदची ही मानाची वगदी खऱ्याखुऱ्या वगदीप्रमाणेच होती; परंतु अत्यंत लहान आकाराची असल्याने लक्षवेधी ठरली.