शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांचे दर कमी करा, अन्यथा विक्री करू देणार नाही

By admin | Updated: May 3, 2015 02:08 IST

कृषीमंत्री एकनाथ खडसे यांचा इशारा; कपाशी बियाण्यांच्या पाकिटावरील एमआरपी कमी करण्याचेही निर्देश.

बुलडाणा : गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी खचला आहे. त्यामुळे बीटी कापूस बियाणे कंपन्यांना दर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या कंपन्या दर कमी करणार नाहीत, त्यांना राज्याच्या कोणत्याही कोपर्‍यात बियाण्यांची विक्री करू देणार नाही, असा सज्जड दम राज्याचे महसूल तथा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे दिला. गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी देशोधडीला लागला असतानाच, बियाणे कंपन्यांनी बियाणांच्या भावात प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करण्यासाठी कसरत करावी लागते. सर्वसामान्य शेतकर्‍यांना परवडेल अशा भावात बीटी बियाण्यांची विक्री करण्याचे निर्देश संबंधित कंपन्यांना दिले आहेत. भाव नियंत्रित करण्यासाठी नकार देणार्‍या कंपन्यांना आपण राज्यात कापूस बियाणे विकू देणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.              खरीप हंगाम नियोजन सभा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी नियोजनासंदर्भा त सूचना करताना ते बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्ष अलकाताई खंडारे, आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, चैनसुख संचेती, राहुल बोंद्रे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, विभागीय कृषी सहसंचालक सु.रा सरदार, अ ितरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हजारे, जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, सभापती सुलोचनाताई पाटील आदी उपस्थित होते. *बोगस बियाणे देणार्‍यावर फौजदारी कारवाईबोगस बियाणे असल्याचे व बियाण्यांमध्ये उगवणशक्ती नसल्याचे सिद्ध झाल्यास अशा बियाणे उत्पादकांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्या जाणार आहे. संबंधित शेतकर्‍याने जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर त्याला पुराव्याची गरज पडणार नाही. उत्पादकाला निर्दोष असल्याचे सिद्ध करावे लागेल, अशी तरतूद असणारा नवीन कायदा सरकार लवकरच आणणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्नी एकनाथराव खडसे यांनी आज केले.