शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

रानतुळसमुळे ज्ञानगंगा अभयारण्याततील वन्यजीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:24 IST

Dnyanganga Sanctuary, Buldhana, Wildlife रानतुळसमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ज्ञानगंगा अभयारण्यात रानतुळस वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वनस्पतीच्या परिघात किटक, फूलपाखरू, मधमाशी तसेच प्राणी येत नसून गवताळ भाग कमी होत आहे. झपाट्याने वाढत असलेल्या रानतुळसमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यात असलेले ज्ञानगंगा अभयारण्य २०५ हेक्टरमध्ये पसरले आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, तडस, हरिण, नीलगाय, सांबर, कोल्हा, लांडगा, माकड, खवले मांजर, ससा, जंगली कुत्रे, सायाळ यासह विविध प्राणी आढळतात. या जंगलात सागवान, अंजन, आवळा, गोंदण, खैर, टेंभुर्णी, हिवर, कळस, काळशिवर यासह विविध वृक्ष आहेत. या जंगलात मोठ्या प्रमाणात गवत आहे. जवळपास दोन ते फूट उंच गवत या जंगलात आढळते. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्याही अधिक आहे. या जंगलात गत काही वर्षांपासून रानतुळस वनस्पतीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अत्यंत झपाट्याने ही वनस्पती वाढत आहे. रानतुळस वनस्पतीची दुगंर्धी येते. या वनस्पतीलगत कोणतेही गवत व वृक्ष वाढत नाही. तसेच किटक, फूलपाखरू, मधमाशी, भिंगोटेही या वनस्पतीवर बसत नाही. किंवा या वनस्पतीच्या आसपास भटकतही नाही. पूर्वी या जंगलात गवत मोठ्या प्रमाणात होते. मात्र आता रानतुळस वाढत असल्याने गवत कमी होत आहे. दिवसेंदिवस या वनस्पतीचे क्षेत्र वाढत आहे. रानतुळस असलेल्या भागात हरिण, रोही किंवा अन्य तृणभक्षी प्राणीही फिरकत नाहीत. यामुळे हरिण, रोही, सांबर या प्राण्यांचे खाद्यच कमी होत असल्याने हे प्राणी जंगत सोडून आजूबाजूच्या शेतातील पिकांकडे वळत आहे.वन्यजीवांचा अधिवास संकटातअत्यंत वैभवसंपन्न जैवविविधता असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात रानतुळस वाढतच आहे. या रातुळसच्या जवळपास वृक्ष, किटक, प्राणी असा कोणताही सजिव आढळत नाही. वनस्पतीला बिज मोठ्या प्रमाणात येत असून, एक झाड दुसऱ्या वर्षी आजूबाजूच्या परिसरात पसरते. त्यामुळे हळूहळू वन्यजीवांचा अधिवास संकटात येत आहे.

रानतुळस निर्मुलन रखडलेवनविभागाच्यावतीने काही वर्षांपूर्वी रानतुळसचे निर्मुलन करण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव रानतुळसचे निर्मुलन रखडले आहे. मात्र ही वनस्पती झपाट्याने वाढत असल्याने गवताळ भाग कमी होत आहे. 

 

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणा