शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

राजीव गांधी प्राणवायू प्रकल्प जीवनदायी ठरणार : मुकुल वासनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

स्थानिक अनुराधा नगर परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण मुकुल वासनिक यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी ...

स्थानिक अनुराधा नगर परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण मुकुल वासनिक यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी पार पडले. कोविड रुग्णांप्रती असलेली काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची तळमळ आजवर केलेल्या कार्याचे वासनिकांनी यावेळी कौतुक केले. माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी कोरोना काळात अनुराधा मिशनच्या अंतर्गत २०० खाटांच्या कोविड सेंटरच्या माध्यमातून केलेले कार्य व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी लाभलेल्या लोकसहभागाची माहिती प्रास्ताविकात दिली. प्रकल्प उभारणीला मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे ऋणनिर्देश याप्रसंगी व्यक्त केले. राहुल बोंद्रेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रकल्प उभारणीसाठी सरसावलेले मनोज दांडगे, नंदू शिंदे, शैलेश अय्या, सरपंच हळदे, गुडमार्निंग ग्रुपचे सदस्य आदी दात्यांचा मुकुल वासनिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि. प. अध्यक्षा मनीषा पवार, श्याम उमाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला आ. राजेश एकडे, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, विजय अंभोरे, संजय राठोड, नगराध्यक्ष कासम गवळी, जि. प. सभापती ज्योती पडघान, दीपक देशमाने, अ. रफीक कादर, डॉ. इसरार, मनोज कायंदे, समाधान सुपेकर, अनंत वानखेडे, प्रदीप नागरे, दिलीप जाधव, प्रकाश पाटील, डॉ. अरविंद कोलते, अ‍ॅड. हरिश रावळ, शैलेश सावजी, देवानंद पवार, पद्म पाटील, स्वाती वाकेकर, करुणा बोंद्रे, भास्करराव ठाकरे, सुधाकर धमक, विष्णू पाटील कुळसुंदर, राम जाधव, नंदकिशोर सवडतकर, अतरोद्दीन काझी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र काळे सूत्रसंचालन केले. हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अ‍ॅड. वृषाली बोंद्रे यांनी आभार मानले.

केंद्र सरकारचा दावा खोटा : वासनिक

ऑक्सिजनमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा सपशेल खोटा आहे. केंद्र सरकार वस्तुस्थिती लोकांपासून लपवत आहे. दुसरीकडे भारतीय राज्य घटनेला साक्षी ठेवीत ज्यांनी प्रतिज्ञा केली, त्याच लोकांपासून राज्यघटनेला एकप्रकारे आव्हान दिले जात आहे. न्याय व्यवस्था व लोकशाही व्यवस्थेला त्यांच्यांचकडून धोका असल्याचे, स्पष्ट करीत केंद्रातील मोदी सरकारवर वासनिकांनी टीकास्त्र डागले.