शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही लसीकरणासाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:33 IST

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २३ खेडी येतात. सहा उपकेंद्र असून, एकाही उपकेंद्रावर लस उपलब्ध नाही. दर आठवड्याला केवळ १०० ...

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २३ खेडी येतात. सहा उपकेंद्र असून, एकाही उपकेंद्रावर लस उपलब्ध नाही. दर आठवड्याला केवळ १०० ते २०० लसी उपलब्ध होत असल्याने २० टक्केही लसीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी, किंबहुना आपल्याला आजार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ४०० ते ५०० नागरिक सकाळपासून लस घेण्यासाठी ठाण मांडून बसतात. आता लस येईल, दुपारला येईल या आशेवर दिवसभर रांगेत ताटकळत बसतात. यामध्ये ४५ वर्षांपासून ते ८०, ८५ वयोवृद्धांचा समावेश असतो. मोहाडी येथील दोन वयोवृद्ध गेल्या सोमवारपासून दररोज लसीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात हजेरी लावत आहेत. परंतु, त्यांना लस मिळाली नाही. आज त्या दोन वयोवृद्ध पती-पत्नीला लस टोचून घ्यावी लागली. असे कितीतरी वृद्ध आज लसीकरण केंद्रावर लसीकरिता ताटकळत उभे राहिले होते. दुपारी १२ पर्यंत लस उपलब्ध झाली नव्हती. त्यानंतर केवळ १०० लस उपलब्ध झाल्याने १०० व्यक्तींनाच लस देण्यात आली. इतर नागरिकांना मात्र परत जावे लागले.

केंद्रावर पोलीस बंदोबस्त

दुसरी लस टोचून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची डोकेदु:खी वाढली आहे. त्यात नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी १२ वाजता नागरिकांना शांत करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. बीट जमादार रामदास वैराळ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना शांत करून सर्वांना लस मिळेल. परंतु, केवळ १०० जणांनाच लस मिळाल्याने अनेकांना परत जावे लागले.

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहाता राजकीय पक्षांनी पक्षभेद बाजूला सारून तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून द्यावी. नागरिकांना दिलासा द्यावा.

अशोक खरात,

माजी सरपंच, शिंदी.