बुलडाणा : पेरणीपूर्वी आपल्याकडे असलेले खत पिकांसाठी योग्य आहे किंवा नाही, असल्यास पेरणीसोबत हे खत किती प्रमाणात टाकावे, याबाबत निश्चित अनुमान काढणे आणि खताची गुणवत्ता तपासण्यासाठी खत परिक्षण केले जाते. या परिक्षणामध्ये गत पाच वर्षांमध्ये ११,१५६ खत नमूणे अप्रमाणित ठरविण्यात आले आहे.खत नियंत्रण आदेश १९८५ च्या कायद्यानुसार खताची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर केली जाते. यासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि अमरावती येथे खत नियंत्रण प्रयोगशाळा कार्यरत आहे. शेतकर्यांनी स्वत: उत्पादीत केलेल्या किंवा खरेदी केलेल्या खताबद्दल शंका असल्यास, विशिष्ट शुल्क आकारून येथे खत नमुण्यांचे विश्लेषण करुन त्याची गुणवत्ता तपासली जाते.२00८ ते २0१३ या पाच वर्षांच्या काळात खत नियंत्रण प्रयोगशाळांकडे विविध जिल्ह्यांमधून ७७ हजार ८५ खतांचे नमूणे तपासणीसाठी प्राप्त झाले. त्यापैकी ७३ हजार ८३५ खत नमुण्यांचे पृथ्थकरण करुन, प्रयोगशाळेत त्याचे विश्लेषण करण्यात आले. या तपासणीत ११ हजार १५६ खत नमूणे अप्रमाणित ठरविण्यात आले.(प्रतिनिधी).**खत विश्लेषणात शिसे, जस्त, तांबे, मॅग्नेशियम, बोरॉन, मॉलिब्डीनम, लोह, नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर, कॅल्शियम, एॅशचे प्रमाण, सी.एन.प्रमाण, ऑरगॅनिक मॅटर, सोडीयम इत्यादी घटकांचे विश्लेषण करण्यात येते. जैविक खतांमध्ये रायझोबियम, एॅझेटोबॅक्टर, फॉस्फेट विरघळविणार्या जिवाणुंची तपासणी केली जाते.**वर्ष तपासलेले नमूणे अप्रमाणित नमूणे२00९-१0 १३८९२ २0८२२0१0-११ १४९८९ २३३0२0११-१२ १६४0३ २२९७२0१२-१३ १६९३९ २८२७
खतांची गुणवत्ता ढासळली
By admin | Updated: July 1, 2014 02:22 IST