शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोताळ्यात कोपर्डी प्रकरणाचा निषेध

By admin | Updated: July 20, 2016 00:18 IST

मोताळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

मोताळा (जि. बुलडाणा) : कर्जत तालुक्यातील कोपर्डी (जि.अहमदनगर) येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निंदनीय हत्याकांडप्रकरणी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यावतीने मंगळवारी मोताळा येथे तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना व महिला पदाधिकार्‍यांसह तालुकाभरातील नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आरोपींविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली व तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सामूहिक निवेदन दिले.मोताळा बसस्थानकावरून सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत तहसील कर्यालयावर मोर्चा नेला. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पाटील यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून अत्याचार करणार्‍या त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. पत्रकार विश्‍वास पाटील यांनी समाजामध्ये पुन्हा अशा घटना घडू नये, यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करीत संबंधित खटला ह्यफास्ट ट्रॅकह्ण न्यायालयात चालवून पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. शिवसेना नेते गजानन मामलकर यांनी अत्याचार प्रकरणात सहभागी आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी व दोषींविरुद्ध कडक कारवाई करून या कुटुंबाला न्याय देण्याकरिता आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.